पाकच्या सिंध प्रांतात तबलिगींकडून केल्या जाणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंची निदर्शने
हा आहे तबलिगी जमातवाल्यांचा खरा तोंडवळा ! भारतात कोरोनाच्या काळात तबलिगींनी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे या जमातवाल्यांवर भारतात बंदी घालण्याची मागणी देशातील राष्ट्रप्रेमींनी केली पाहिजे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. पाकमध्ये तबलिगी जमातवाले आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत आहेत. नकार दिल्यावर आमचा छळ केला जात आहे. आमची घरे जमीनदोस्त केली जात आहेत. एका हिंदु तरुणाने धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर त्याचे अपहरण करण्यात आले, असे आरोप या हिंदूंनी केले आहेत.
१. या आंदोलनाचे २ व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. एका व्हिडिओमध्ये मटियार येथील नसूरपूरमध्ये महिला आणि मुले फलक घेऊन उभे आहेत. ते तबलिगी जमातच्या विरोधात निदर्शने करत आहेत. आम्ही मरण पत्करू; मात्र इस्लाम स्वीकारणार नाही, असे ते म्हणत आहेत.
२. निदर्शन करणार्यांपैकी एक महिला या व्हिडिओत म्हणत आहे की, तिची सर्व संपत्ती हडप करण्यात आली. घर जमीनदोस्त करण्यात आले. तिला मारहाणही करण्यात आली. तबलिगींनी तिला धमकी दिली आहे की, तुम्ही परत घरी गेला, तर तुम्हाला इस्लाम स्वीकारावा लागेल.
३. दुसर्या व्हिडिओमध्ये एक महिला भूमीवर झोपून रडत आहे. ती म्हणते की, तबलिगींनी तिच्या मुलाचे अपहरण केले आहे. मुलाच्या सुटकेसाठी ती त्यांच्याकडे भीक मागत आहे.
सिंधमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण होते !
अमेरिकेतील सिंधी फाउंडेशनच्या माहितीनुसार सिंध प्रांतामध्ये प्रतिवर्षी १२ ते २८ वर्ष वयोगटातील १ सहस्र हिंदु मुली आणि तरुणी यांचे अपहरण केले जाते. त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्यानंतर मुसलमान व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात