लंडन (ब्रिटन) : हत्या करण्यासाठी भडकावून द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या डॉ. झाकीर नाईक याच्या ‘पीस टीव्ही’ आणि ‘पीस टीव्ही उर्दू’ या दूरचित्रवाहिन्यांना ब्रिटनमध्ये २ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणार्या ब्रिटन सरकारच्या ऑफकॉम या संस्थेने हा दंड ठोठावला.
( सौजन्य: टाइम्स नाऊ )
१. ऑफकॉमने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीस टीवी उर्दूवर २ लाख पाउंड आणि पीस टीव्हीवर १ लाख पाउंड असा दंड ठोठावण्यात आला आहे. या वाहिन्यांवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आक्षेपार्ह होते. यातून लोकांना गुन्हे करण्यासाठी भडकावण्यात येत असल्याचे दिसून आले.
२. ऑफकॉमने पीटी टीव्ही उर्दूला देण्यात आलेली अनुज्ञपप्ती (लायसेन्स) नोव्हेंबर २०१९ मध्येच रहित केली आहे. सध्या पीस टीव्ही आणि पीस टीव्ही उर्दू या दोन्ही वाहिन्यांना ब्रिटनमध्ये प्रक्षेपण करण्याची अनुमती नाही. मधल्या काळात येथील क्लब टीव्हीने पीसी टीव्ही उर्दूवरील काही कार्यक्रमांचे प्रसारण चालू केले होते. ऑफकॉमने ते बंद करण्यास भाग पाडले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात