देशात हलाल प्रमाणित उत्पादनांची निर्माण झालेली दहशत आता केंद्र सरकारने मोडून काढणे आवश्यक !
मुंबई : ऑनलाईन किराणा साहित्य विकणार्या बिग बास्केट या आस्थापनाने काही दिवसांपूर्वी तिच्या ग्राहकांना सांगितले होते की, येथे केवळ हलाल मांस विकले जाईल. यानंतर या आस्थापनावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊन वाद निर्माण झाला. आस्थापन केवळ मुसलमानांचीच मागणी पूर्ण करते आहे का ? मुसलमानेतरांना हलाल मांस खाण्यासाठी बाध्य का केले जात आहे ? भारतात शरीयत कायदा लागू झाला आहे का ?, असे प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात आले. त्यामुळे आता या आस्थापनाने ग्राहकांसाठी झटका मांसही उपलब्ध केले आहे.
हलाल आणि झटका म्हणजे काय ?
झटका सर्टिफिकेशन अॅथॉरिटीचे अध्यक्ष रवि रंजन सिंह यांनी सांगितले की, हिंदू, शीख आदी भारतीय परंपरेमध्ये प्राण्याचा बळी देण्यात वापरण्यात येणारी पद्धत ही झटका पद्धत आहे. यामध्ये प्राण्याच्या मानेवर एका झटक्यात वार करून त्याचा शिरच्छेद केला जातो. त्यामुळे प्राण्याला मृत्यूच्या वेळी अल्प त्रास होतो. याउलट हलाल पद्धतीत प्राण्याची गळ्याजवळील नस पकडून ती हलकी कापून सोडून दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहते आणि प्राणी तडफडून तडफडून मरतो. इतकेच नव्हे, तर प्राण्याला मारतांना त्याचे तोंड मक्केच्या दिशेने करावे लागते. हलाल प्रमाणे प्राण्याची हत्या, तसेच प्राण्याचे मांस काढून त्याची पुढची सर्व प्रक्रिया मुसलमानच करू शकतो. यामुळे या व्यवसायात केवळ मुसलमानांनाच काम मिळू शकते. त्यामुळे हलाल पद्धत अन्य धर्मियांवर अन्याय करणारी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात