Menu Close

दावणगेरे (कर्नाटक) येथे हिंदूंच्या दुकानांतून मुसलमान महिलांनी साहित्य खरेदी केल्यामुळे धर्मांधांकडून त्यांना शिवीगाळ

  • याविषयी अद्याप देशातील एकाही पुरो(अधो)गाम्याने आणि निधर्मीवाद्याने किंवा मुसलमान नेत्याने तोंड उघडलेले नाही, हे लक्षात घ्या !
  • एकीकडे हिंदूंना हलाल प्रमाणित वस्तू विकत घेण्यास भाग पाडले जात आहे, तर दुसरीकडे मुसलमानांना हिंदूंच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा फतवा धर्मांध काढत आहेत. हे पहाता भारताची इस्लामीस्तानच्या दिशेने वाटचाल होत आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये !

दावणगेरे (कर्नाटक) : येथे आगामी ईदसाठी हिंदूंच्या दुकानातून साहित्यांची खरेदी केल्यामुळे धर्मांधांनी मुसलमान महिलांना शिवीगाळ केली. याविषयीचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात धर्मांध या महिलांशी गैरवर्तन करत त्यांच्या हातातील कपड्यांची पिशवी हिसकावून घेऊन फेकून देत असल्याचे दिसत आहे.

१. येथील हिंदूंच्या मालकीच्या असणार्‍या बी.एस्. चन्नबसप्पा अँड सन्स या कपड्यांच्या दुकानातून बुरखा घातलेल्या काही महिला बाहेर पडत आहेत. त्यांना लगेच धर्मांधांचा जमाव चारही बाजूंनी घेरत आहे आणि त्यांना उलट सुलट प्रश्‍न विचारत आहे. त्यांच्या हातातील भगव्या रंगाची पिशवी हिसकावून घेऊन फेकून दिली जात आहे. या वेळी या महिला त्यांना जाऊ देण्याची धर्मांधांना विनवणी करत असल्याचेही दिसत आहे.

२. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये मुसलमान महिलांना हिंदूंच्या दुकानांतून खरेदी केलेले साहित्य परत करण्यास धर्मांधांकडून भाग पाडण्यात आल्याचे दिसत आहे. यात एक धर्मांध तरुण मुसलमान महिलेच्या हातातील भगवी पिशवी खेचून घेत आहे, तर धर्मांधांचा जमाव २ मुसलमान महिलांना रिक्शामध्ये बसवून हिंदूच्या दुकानात परत जाऊन साहित्य परत करण्यास सांगत आहे.

३. तिसर्‍या व्हिडिओमध्ये हिंदूच्या दुकानातून वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाणार्‍या २ मुसलमान महिला आणि एक लहान मुलगा यांना धर्मांध धमकी देत आहेत, असेही दिसत आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *