Menu Close

देहलीतील ५.२ एकर भूमीवर घुसखोर रोहिंग्या मुसलमानांचे अतिक्रमण

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी घुसखोर रोहिंग्यांना आधारकार्ड बनवून देत त्यांना वसवल्याचा आरोप

यावरून घुसखोरांना कोण साहाय्य करत आहे ?, हे लक्षात येते. घुसखोरांवर कारवाई करतांना त्यांना साहाय्य करणार्‍यांवरही कारवाई केली पाहिजे !

सौजन्य : न्यूजट्रेंड

नवी देहली : देहलीतील मदनपूर खादर या भागामध्ये घुसखोर रोहिंग्या मुसलमानांनी ५.२ एकर भूमीवर अतिक्रमण केले आहे. देहली वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे विद्यमान आमदार अमानतुल्लाह खान यांनी या सर्व घुसखोर रोहिंग्यांना आधारकार्ड बनवून देत त्यांना येथे वसवले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. आता या घुसखोर रोहिंग्यांना सर्व प्रकारच्या सरकारी सुविधा मिळत आहेत.

१. याविषयी दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, देहलीतील कालिंदी कुंज भागामध्ये रहाणारे रोहिंग्या मुसलमान अमली पदार्थांच्या व्यवसायामध्ये सहभागी आहेत.

२. येथील रेसिडेंस वेलफेअर असोसिएशनने म्हटले की, मी अनेकदा येथील रोहिग्यांची वस्ती हटवण्यासाठी प्रयत्न केला; मात्र त्यात मला यश आले नाही. या भूमीची जागा कोट्यवधी रुपयांची आहे. या घुसखोरांना देहली सरकारकडून अभय देण्यात आलेले आहे, असे म्हटले जात आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *