‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावरील वाचकांसाठी शिबिर
कोल्हापूर : भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ १५ टक्के असतांना उर्वरित ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल’ प्रमाणपत्र लादले जात आहे. या प्रमाणिकरणाद्वारे कोट्यवधी रुपये इस्लामी संघटनांनाच मिळत आहेत. भारतात मिळणार्या बहुतांश उत्पादनांनी हलाल प्रमाणपत्र घेतले आहे. या माध्यमातून ३.२ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळे ही समस्या केवळ ‘जिहाद’पुरती मर्यादित नसून आता हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील वाचकांसाठी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून १७ मे या दिवशी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या शिबिरासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी या जिल्ह्यांतील १७४ जिज्ञासू सहभागी झाले होते.
प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. श्री. मनोज खाडये यांनी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरानंतर कृतज्ञता व्यक्त करून शिबिराची सांगता करण्यात आली.
डोळ्यांना न दिसणारा कोरोना विषाणू जर जगाला वेठीस धरू शकतो, तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत आपले रक्षण निश्चित करू शकतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
काही मासांपूर्वी जर आपल्याला ‘कोरोना नावाचा विषाणू असेल’, असे सांगितले असते, तर आपला कुणाचाही विश्वास बसला नसता. या विषाणूने आता जगभरात थैमान घातले आहे. ईश्वरही आपल्या डोळ्यांना दिसत नाही; मात्र त्याची अनुभूती येते. डोळ्यांना न दिसणार्या विषाणूवर आपण ज्याप्रकारे विश्वास ठेवतो, त्याचप्रकारे डोळ्यांना न दिसणारा भगवंत आपले रक्षण करू शकणार नाही का ? त्यासाठी प्रत्येकाला साधना करून ईश्वराचे भक्त व्हावे लागेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात