Menu Close

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’ : नेपाळचे पंतप्रधान

  • चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !
  • नेपाळसारखा छोटासा देश भारताला दरडावतो, हे संतापजनक होय ! अशा भारतविरोधी देशांच्या विरोधात भारताने आक्रमक धोरण अवलंबून त्यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक !

काठमांडू (नेपाळ) : काही लोक अवैधरित्या भारतातून नेपाळमध्ये येत आहेत आणि ते देशात मोठ्या प्रमाणात विषाणूंचा प्रसार करत आहेत. त्यांच्यासमवेत स्थानिक प्रतिनिधी आणि पक्षाचे नेते हेही चाचणीविना या लोकांना नेपाळमध्ये आणण्यासाठी उत्तरदायी आहेत. बाहेरून येणार्‍या लोकांमुळे नेपाळमध्ये कोरोनावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. भारतीय विषाणू आता चीन आणि इटली येथील विषाणूंपेक्षाही अधिक प्राणघातक होऊ लागला आहे. यामुळे अनेक लोक संक्रमित होत आहेत, असे विधान नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी केले आहे. नेपाळने त्याचे नवीन मानचित्र (नकाशा) प्रकाशित केल्यानंतर काही घंट्यांनंतरच त्यांनी हे विधान केले आहे. या मानचित्रात भारतातील लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भाग दाखवले आहेत. हे भाग नेपाळचे आहेत, असा दावा ओली शर्मा यांनी केला आहे. अलीकडेच त्यांनी भारत दादागिरी करत असल्याचा कांगावा केला होता.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *