पणजी – गोव्यात होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीचे सचिव शैलेंद्र वेलिंगकर यांनी इतर पदाधिका-यांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. गोव्यातील हिंदू लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून हे धर्मांतरण करण्यात येते. तशी धर्मांतरणाची अनेक प्रकरणे गोव्यात घडत असून त्याचे लोण सर्वत्र पसरत चालले आहे. सरकारी इस्पितळातही हा प्रकार होत असून ‘बिलिव्हर्स’ पथांत हे धर्मांतरण होत असल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला.
या कामासाठी परदेशातून मोठय़ा प्रमाणात पैसा पुरवण्यात येत असून हे रोखता यावे म्हणून समिती गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणी सरकारने कारवाई करण्याची मागणी समितीने केल्याचे ते म्हणाले.
समितीचे अध्यक्ष विनय तळेकर असून उपाध्यक्ष माधव वर्डीकर आहे. महिला प्रमुख राजश्री गडेकर असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.
स्त्रोत : तरूण भारत