Menu Close

धर्मांध पतीकडून हिंदु पत्नीला गोमांस खाण्यास आणि धर्मांतर करण्यास बळजोरी !

विवाहीत धर्मांधाकडून हिंदु तरुणीची फसवणूक करून तिच्याशी लग्न

  • प्रेमाच्या आड धर्म येत नाही, असे बरळणारे पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, काँग्रेसी आदी आता याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु महिलांचे रक्षण करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची असलेली नितांत आवश्यकता आता तरी जाणा !

नवी देहली : पती नफीस खान मला सतत मारहाण करतो, तसेच मा गोमांस खाण्यासाठी अन् धर्मांतर करण्यासाठी बलजोरी करतो, असा आरोप करणार्‍या नेहा खान नावाच्या हिंदु महिलेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. मी हिंदु आहे. माझा पती मुसलमान आहे. मी देहली येथील बुराडी भागात रहाते. मार्च २०१८ मध्ये मी नफीस खान नावाच्या मुसलमानाशी विवाह केला होता. विवाहाला दीड मास उलटतो, तोच नफीसने मला मारहाण करणे चालू केले. तो धर्माच्या नावाने माझ्यावर अत्याचार करतो, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

नेहा हिने नफीस खान याच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.  यात तिने म्हटले आहे की, नफीस खान पूर्वीपासूनच विवाहीत असल्याचे मला विवाहानंतर समजले. नफीसने माझी फसवणूक केली आहे. तो मला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत असतो. तू अद्याप पक्की मुसलमान झालेली नाहीस. गोमांस खा, म्हशीचे मांस खा. तेव्हाच तू खर्‍या अर्थाने मुसलमान होशील, असे म्हणत नफीस माझ्यावर बळजोरी करतो.

नेहाच्या अधिवक्त्यांना पाकिस्तानमधून धमक्या !

नेहाचे अधिवक्ता करुणेश शुक्ला यांनी सांगितले की, नफीसने विवाहाच्या पूर्वी नेहाला ती हिंदु धर्मानुसार पूजा-पाठ चालू ठेवू शकते, असे सांगितले होते; परंतु विवाहानंतर काही दिवसांतच नफीस तिच्यावर गोमांस खाण्याची बळजोरी करू लागला, तसेच नमाजपठण करण्यासाठी आणि कुराणचे वाचन करण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागला. या प्रकरणी मला पाकिस्तानमधून धमकावले जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *