मुसलमानबहुल देशांत हिंदू असुरक्षित !
ढाका (बांगलादेश) : कोमिल्ला जिल्ह्यातील ललितशहर गावात रहाणार्या नीताई चंद्र दत्त यांच्या कुटुंबावर धर्मांधांच्या एका गटाने १९ मे या दिवशी दुपारी धारदार शस्त्रांंनी आक्रमण करून कुटुंबातील ७ सदस्यांना गंभीर घायाळ केले. त्या सर्वांना स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने या प्रकरणाची चौकशी केली आहे.
१. गावातील गुंड कमल हसन आणि त्याच्या समवेत महंमद गुलाम मुस्तफा यांनी त्यांच्या साथीदारांसमवेत वरील आक्रमण केले. नीताई चंद्र दत्त यांचा शेतीच्या प्रकरणी स्थानिक धर्मांधांशी वाद झाला होता. त्याची परिणती या आक्रमणात झाल्याचे कळते.
२. आक्रमण झाल्यानंतर दत्त कुटुंबियांनी डेबीद्वार पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार केली; मात्र पोलिसांनी त्याची नोंद घेतली नाही. बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी दत्त कुटुंबियांना कायदेशीर सल्ला दिल्यानंतर त्यांच्या वतीने श्री. कृष्ण कांत दत्त यांनी लेखी तक्रार केली. त्यावर पोलिसांनी अन्वेषण करून कमल हसन, महंमद गुलाम मुस्तफा आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला. कमल हसन याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याने अनेक हिंदु महिला आणि मुली यांचा विनयभंग केल्याचे कळते.
३. बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी या प्रकरणी आरोपींना अटक करून शिक्षा ठोठावण्याची मागणी करून हिंदूंना घटनात्मक संरक्षण द्यावे, अशी विनंती शासनाला केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात