Menu Close

पाकमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या देखरेखीमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर बुलडोजर फिरवला !

पाकमध्ये रहाणार्‍या हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांच्यावर सातत्याने असे अत्याचार केले जात आहेत. कोणताही मानवाधिकार आयोग हे रोखू शकलेला नाही आणि रोखूही शकत नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

बहावलपूर (पाकिस्तान) : पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूमध्ये पाकचे गृहनिर्माण मंत्री तारिक बशीर चीमा यांच्या देखरेखीमध्ये येथील अल्पसंख्यांक हिंदूंची घरे बुलडोजरने पाडून हिंदूंना बेघर करण्यात आल्याची घटना समोर आली. या वेळी पाकचे मुख्य सूचना अधिकारी शाहरूख खोखर हेही उपस्थित होते. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हिंदूंच्या घरांवर बुलडोजर फिरवले जात असतांना हिंदु महिला, पुरुष, मुले घरे तोडू नयेत, अशी विनंती करत होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी पंजाब प्रांताच्याच खानेवल जिल्ह्यामध्ये ख्रिस्ती लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरवण्यात आला होता. पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफच्या नेत्याने हे कृत्य केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *