वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींचे कब्रस्तानमध्ये रूपांतर का करण्यात येत नाही ?
नवी देहली : देहलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावणार्यांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे. यामध्ये मुसलमानांची संख्या अधिक असल्याने देहलीतील कब्रस्तानांची जागा आता मृतदेह पुरण्यासाठी अल्प पडू लागल्याने पर्यायी जागांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच येथील इंद्रप्रस्थ भागातील मिलेनियम पार्कचे कब्रस्तान करण्याच्या प्रयत्नाचा विश्व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. या संदर्भात विहिंपने राज्याचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहून येथे कब्रस्तान करण्यास विरोध केला आहे.
विहिंपने आरोप केला आहे की, देहली वक्फ बोर्डाचा यामागे षड्यंत्र असून देहली सरकारमधील काही लोकांचे त्याला समर्थन आहे. विहिंपने उपराज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या भूमीवर अवैधरित्या नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे लावण्यात आलेला ‘जदीद कब्रिस्तान अहाले इस्लाम’चा फलक तात्काळ काढून टाकण्यात यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात