नेहमीच परदेशी लोकांचे अनुकरण करणार्या भारतीय महिलांना चपराक !
बँकॉक : थायलंडचे पंतप्रधान प्रयूत चान ओचा यांनी तोकडे कपडे घालणार्या महिला वेष्टन नसलेल्या चॉकलेटप्रमाणे असतात, असे विधान केले आहे. वेष्टन नसलेले चॉकलेट लोकांना आवडत नाही. देशातील महिलांनी अंगप्रदर्शन होईल, असे कपडे घालू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (योग्य आवाहन असभ्य भाषेत केले तर परिणाम चुकतात आणि वाद निर्माण होतात. त्यामुळे पंतप्रधानांनी योग्य भाषेत आवाहन करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
थायलंडमध्ये लवकरच पारंपारिक नववर्षानिमित्त सोन्क्रान या सणाला प्रारंभ होणार आहे. या वेळी लोक एकमेकांवर पाणी उडवतात तसेच महिलांची छेडछाड होण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. सान्क्रोनच्या वेळी महिलांनी थायलंडच्या संस्कृतीला शोभतील, असे योग्य कपडे परिधान करावेत. या कपड्यांमुळे महिला अधिक सुंदर आणि सभ्य दिसतील, असेही ते म्हणाले. यापूर्वीही त्यांनी महिलांसंदर्भात वक्तव्य केली आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात