सोलापूर : २२ मे या दिवशी पहाटे सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथे नाकाबंदीसाठी कर्तव्यावर असलेले सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील रामेश्वर परचंडे यांच्या अंगावर गौस कुरेशी याने चारचाकी वाहन घालून त्यांना उडवले. साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी परचंडे यांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात भरती केले; मात्र उपचारादरम्यान २३ मे च्या पहाटे पोलीस परचंडे यांचा मृत्यू झाला. धर्मांध कुरेशी हा चारचाकीतून जनावरांची वाहतूक करत होता.
या घटनेनंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी गौस कुरेशी याने गुन्हा मान्य केला असून त्याच्याविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामेश्वर परचंडे यांच्या पार्थिवावर शासकीय मानवंदनेत अंत्यसंस्कार करण्यात आले. (केवळ गुन्हा नोंद करून न थांबता कठोरात कठोर शिक्षेची कार्यवाही करणे हीच खर्या अर्थाने मानवंदना ठरेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
दळणवळण बंदी असूनही गोवंशियांची वाहतूक करणार्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या !
अखिल भारत कृषी गोसेवा संघाची मागणी
सोलापूर : अनेक वेळा गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे झाली आहेत, याची माहिती वेळोवेळी आम्ही शहर आणि ग्रामीण पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रारींद्वारे दिली होती; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. सध्या दळणवळण बंदी आहे, तसेच महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही सर्रास गोमातेच्या हत्या होत आहेत, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ, सोलापूरच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील अवैधरित्या चालू असलेली मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात यावी, अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंंभरकर यांना केली होती; पण त्यावर जिल्हाधिकार्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी या पत्राची नोंद घतली असती. तर आज पोलीस परचंडे यांचा जीव वाचला असता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात