नेपाळ चीनचा बटीक बनला आहे, हे सत्य भारताच्या सैन्यप्रमुखांनी मांडल्यावर नेपाळी राज्यकर्त्यांना ते झोंबले. ‘सत्य हे कडू असते ‘ हे नेपाळी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
काठमांडू (नेपाळ) : भारताच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावतात त्या नेपाळी गोरखा सैनिकांच्या भावना भारतीय सैन्यदलप्रमुखांनी दुखावल्या आहेत. भारतीय सैन्यदलप्रमुखांना राजकीय विधान करण्याचा अधिकार आहे का ? आमच्या येथे असे होते नाही. नेपाळी सैन्य कधीही अशा प्रकरणात बोलत नाही, अशा शब्दांत नेपाळचे संरक्षणमंत्री ईश्वर पोखरेल यांनी भारतीय सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी केलेल्या विधानाविषयी थयथायट केला. ते एका मुलाखतीत बोलत होते.
भारताने उत्तराखंड येथील लिपुलेख ते धाराचुला असा ८० कि.मी. अंतराचा मार्ग बनवल्यावर नेपाळने हा भाग त्याचा असल्याचे सांगत भारतावर टीका केली होती. यावर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, मला ठाऊक नाही की, नेपाळ का टीका करत आहे ? यापूर्वी तर असे कधीच झाले नव्हते. कुणा अन्य घटकामुळे नेपाळ हे सूत्र उपस्थित करत आहे, अशी शंका निर्माण होते. यावरून जनरल नरवणे यांनी अप्रत्यक्ष चीनकडे अंगुलीदर्शन केले होते. याचाच राग नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांना आल्याचे दिसून आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात