अधिवक्त्यांसाठीच्या विशेष कार्यशाळेसाठी ६० अधिवक्त्यांची उपस्थिती
कोल्हापूर : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानचे सोने घेण्याच्या संदर्भात केलेले विधान; पालघर, तसेच अन्य ठिकाणी साधू-संत यांवर होणारी आक्रमणे, तसेच अन्य चालू घडामोडी यांच्यावर अधिवक्त्यांनी सामाजिक माध्यमांतून व्यक्त व्हावे. अधिवक्त्यांनी त्यांची शक्ती धर्मकार्यासाठी लावली पाहिजे. त्यासाठी हिंदू अधिवक्त्यांचे संघटन वाढवले पाहिजे, असे आवाहन असे मार्गदर्शन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. २३ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे अधिवक्त्यांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेसाठी पुणे, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील ६० अधिवक्ते उपस्थित होते.
शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी सांगितला. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी तणामुक्तीसाठी साधनेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी अधिवक्ता सुरेश कुलकर्णी म्हणाले
१. परदेशातून येऊन फ्रान्सुआ गोतिएसारखा पत्रकार हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात आवाज उठवू शकतो, तर आपण का करू शकत नाही ?
२. धर्मकार्य करतांना सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता लागते. ती साधनेमुळेच मिळू शकते.
अधिवक्ता म्हणून तुमच्या मताला मूल्य असल्याने तुमचे मत अवश्य नोंदवा ! – मनोज खाडये
काँग्रेसचे सत्य स्वरूप उघड करणारे रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक गोस्वामी अर्णव गोस्वामी यांच्यावर देशभर खटले प्रविष्ट केले जात आहेत. अशा प्रसंगी धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी अधिवक्ते यांनी धर्मकार्य म्हणून यासाठी काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समिती सामाजिक संकेतस्थळे, तसेच अन्य माध्यमे यांतून हिंदूंवर होणार्या आघातांच्या विरोधात आवाज उठवत आहे आणि त्याला यशही येत आहे. एक अधिवक्ता म्हणून तुमच्या मताला मूल्य असल्याने अधिवक्त्यांनी त्यांचे मत प्रत्येक ठिकाणी नोंदवले पाहिजे.
न्यायालयीन क्षेत्रात असलेल्या ताणावर मात करण्यासाठी साधना हाच पर्याय – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
वकिली क्षेत्रात काम करतांना अधिवक्त्यांना वेगवेगळ्या प्रसंगांमुळे ताणाला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी साधना हाच पर्याय आहे. यासाठी कुलदेवता आणि श्री दत्त यांचे नामस्मरण करावे.
हिंदूंवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
कोरोनाची पार्श्वभूमी असली, तरीही अधिवक्त्यांसाठी अनेक क्षेत्र आहेत की, ज्यात ते त्यांच्या ज्ञानाचा वापर करू शकतात. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांचे सोने घेण्याची मागणी केली आहे. अशा वेळी अधिवक्त्यांनी देशातील तिसर्या क्रमांकाची भूमी ज्यांच्याकडे आहे, त्या वक्फ बोर्डाची भूमी शासन शेतकर्यांना कसण्यासाठी का देत नाहीत ? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. हिंदुत्वावर होणार्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भात अधिवक्त्यांनी प्रतिवाद कसा करायचा, याचा मार्ग दाखवला पाहिजे.
तबलिगींमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढला. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात मरकजचा प्रमुख मौलाना साद याला सहआरोपी करा, अशी मागणी अधिवक्त्यांनी रेटून धरली पाहिजे; कारण यांच्यामुळे देशात ठिकठिकाणी धर्मांध कोरोनाग्रस्त असतांना लपून बसले आणि देशातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
क्षणचित्रे
१. बहुतांश अधिवक्त्यांनी तणामुक्तीसाठी साधनेचे महत्त्व विषय आवडल्याचे सांगितले.
२. अनेक अधिवक्त्यांनी प्रत्येक १५ दिवसांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कृतीसाठी सहभाग नोंदवू, असे मत व्यक्त केले.
मनोगत
१. अधिवक्ता रोहिदास – हिंदूंनी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालावा आणि त्यासाठी अन्यांचे प्रबोधन करावे.
२. अधिवक्ता रवींद्र देशमुख – विविध खटल्यांमध्ये अनेक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ कारागृहात खितपत पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी आपण साहाय्य केले पाहिजे.
३. अधिवक्ता शिल्पा पवार, सातारा – हलाल प्रमाणपत्राविषयी जनजागृती करणे चालू आहे. फेसबूकवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालू आहे.
४. अधिवक्ता सुनंदा येवले, तळेगाव-दाभाडे – प्रत्येक १५ दिवसांनी एकत्र येऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात