धर्मनिष्ठ आणि भाविक यांना विश्वासात घेऊन राज्यशासन पुढील दिशा ठरवणार !
- हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !
- हिंदूंच्या मंदिरातील धन ही हिंदु धर्माची संपत्ती आहे आणि ती हिंदु धर्माच्या उत्थानासाठी खर्च केली पाहिजे, असा कायदाच आता केंद्रातील भाजप सरकारने केला पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
तिरुपती (आंध्रप्रदेश) : कोरोना महामारीमुळे उत्पन्न झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आंधप्रदेश शासन नियंत्रित तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने तिरुपती मंदिराच्या ५० संपत्तींची (मालमत्तांची) विक्री करण्याचा ठराव पारित केला होता. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन वरील निर्णय मागे घेण्याचे आंध्रप्रदेश शासनाने ठरवले आहे. (आंध्रप्रदेशमध्ये कट्टर ख्रिस्ती असलेले मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे हिंदु धर्मावर आघात होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे संघटित होऊन धर्मावरील असे आघात परतवून लावणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही माहिती राज्यशासनाकडून २५ मे या दिवशी घोषित केलेल्या एका आदेशाद्वारे देण्यात आली. या आदेशात विश्वस्त मंडळाच्या अधिकार्यांनी हिंदु भाविक, धर्मप्रचारक आणि इतर धार्मिक संस्था यांच्याशी चर्चा करावी, असे शासनाने सुचवले आहे.
१. ही संपत्ती उत्तराखंड, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये आहे. या लिलावाविषयी भाविक आणि धार्मिक पुरोहित यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला, असे देवस्थान मंडळाच्या एका अधिकार्याने सांगितले.
२. या आधी घेतलेल्या मंदिराच्या ५० संपत्तींच्या (मालमत्तांच्या) विक्री करण्याच्या आदेशास सर्व हिंदु धर्मप्रेमी आणि भाविक यांनी तीव्र विरोध केला होता. हा केवळ आर्थिक प्रश्न सोडवण्याचा मार्ग नसून हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी रचलेले मोठे षड्यंत्र आहे, असा आरोप करण्यात आला होता. या तीव्र विरोधाची नोंद घेऊन आंध्रप्रदेश सरकारने मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय मागे घेतला आहे, असे म्हटले जात आहे.
३. आंध्रप्रदेश सरकारने या संपत्तींचा उपयोग मंदिर, धर्मप्रचार आणि इतर धार्मिक कार्यांसाठी वापर करता येईल का ?, यावर विचार करण्यास देवस्थान मंडळाला सांगितले आहे.
४. ज्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार होता, त्यामध्ये लहान घरे, घरांसह भूखंड आणि शेतभूमी यांचा समावेश होता. ही संपत्ती भाविकांनी अनेक दशकांपूर्वी भगवान श्री व्यंकटेश्वरांच्या मंदिराला दान केली होती. त्यांची देखभाल करणे शक्य नाही, तसेच त्यातून कोणत्याही महसुली उत्पन्नाची शक्यता नाही. ही सर्व संपत्ती अगदी क्षुल्लक असून त्याचा देवस्थानाला फारसा उपयोग नाही. आंध्रप्रदेशात अशा प्रकारच्या २६ आणि तमिळनाडूत २३ संपत्ती आहेत, तर हृषिकेशमध्ये १ आहे. यांच्या लिलावातून २४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती देवस्थान मंडळाचे अध्यक्ष वाय व्ही. सुब्बा रेड्डी यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात