तैवानच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे २ खासदार व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिल्याचे प्रकरण
भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणार्या, भारताच्या सीमेवरील काही भागांवर स्वतःचा दावा सांगणार्या चीनला असे सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?
नवी देहली : तैवानच्या राष्ट्रपती साय इंग-वेन यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे २ खासदार व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिले होते. यावरून चीनने भारताला भारताने चीनच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करू नये अशी चेतावणी चीनने भारताला दिली आहे. या कार्यक्रमात ४१ देशांचे ९२ मान्यवर व्यक्ती व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित राहिल्या होत्या. यात भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी आणि राहुल कासवान या दोघांचाही समावेश होता. तैवान चीनचा भाग आहे, असा दावा चीन सातत्याने करत असून त्याला स्वतंत्र देश म्हणून समर्थन देणार्या देशांना चीनकडून विरोध केला जात आहे. यामुळेच चीनने भारतावर टीका केली आहे.
१. देहलीतील चीनच्या दूतावासाचे अधिकारी लिऊ बिंग यांनी म्हटले की, भारताने चीनच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे. साय यांना शुभेच्छा देणे हे अत्यंत अयोग्य आहे.
२. तैवान जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य बनण्यासाठी प्रयत्न करत असून त्याला भारताने समर्थन दिले आहे. या पार्श्वभूमीवर चीनने भारतावर ही टीका केल्याचे समजते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात