Menu Close

आतंकवादी हे इस्लाम धर्माला मानतात, हे आपण स्वीकारले पाहिजे : नदीने अल्-बुदैर, पत्रकार, सौदी अरेबिया

भारतातील ढोंगी निधर्मीवादी पत्रकार कधीही असे बोलणार नाहीत !
आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍या भारतातील ढोगी निधर्मीवाद्यांना चपराक !

terrorist1रियाध : आतंकवादी हे इस्लाम धर्माला मानतात हे आपण स्वीकारले पाहिजे, असे सौदी अरेबिया येथील पत्रकार नदीने अल्-बुदैर यांनी म्हटले आहे. सौदी येथील रोताना खालिजियाह या वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. आपण आपल्याच अंतरात्म्याचा आवाज का लपवत आहोत ?, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

नदीने अल्-बुदैर म्हणाले की,

१. जेव्हा आतंकवादी सामान्य जनतेचा नरसंहार करतात, तेव्हा कथित बुद्धीवादी पुढे येऊन म्हणतात की, ते इस्लाम किंवा मुसलमान नाहीत; परंतु त्यातील कोणी आम्हाला हे सांगू शकेल का की, इस्लाम आणि मुसलमान यांचे प्रतिनिधित्व कोण करत आहे ?

२. अनेक जण म्हणतात की, आतंकवादाशी मुसलमानांचा काही संबंध नाही. जे कोणी आतंकवादामध्ये सहभागी आहेत, ते एकतर दारूडे, व्यसनी किंवा घरातून पळालेले युवक आहेत. आपण सर्व जाणतो की, युरोपमध्ये असे कितीतरी लोक आहेत की जे दारूडे, व्यसनी आणि घर नसलेले आहेत; परंतु ते कधी युरोपमधून अरबमध्ये येऊन आतंकवादी कारवाया करत नाहीत किंवा मशिदींवर आक्रमण करत नाहीत.

३. ब्रुसेल्स येथील आतंकवादी आक्रमणानंतर आता वेळ आली आहे की, आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि हे आतंकवादी अन्य धर्माचे आहेत, असा विचार करणे आपण सोडून दिले पाहिजे.

४. या आतंकवाद्यांचे राष्ट्रीयत्व अरब आहे आणि यांचा धर्म इस्लाम.

५. आपल्याला हे स्वीकारले पाहिजे की, आपणच या आतंकवाद्यांना जन्म दिला आहे आणि त्यांना कट्टरवादाची शिकवणही आपणच दिली आहे.

६. इस्लाम व्यतिरीक्त इतर धर्मातील लोग काफिर आहेत ही शिकवण त्यांना आपल्या शाळा आणि महाविद्यालये यांनीच दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *