Menu Close

सोलापूर येथील नई जिंदगी परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण

सोलापूर : येथील नई जिंदगी परिसरात २७ मे या दिवशी तंबाखू आणि मावा बनवून त्याची विक्री करणारा अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आणि त्याच्या सहकार्‍यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमण करून एका पोलिसाचा भ्रमणभाष हिसकावून घेतला. या आक्रमणात पोलीस घायाळ झाले आहेत. नई जिंदगी परिसरामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये अब्दुल हमीद सय्यद तंबाखू आणि मावा बनवून विक्री करत होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरीत ४ जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईत पोलिसांनी ४ सहस्र ४४० रुपयांचा मावा, सुपारी, तंबाखू  जप्त करून ते अन्न आणि औषध प्रशासनाकडे सुपुर्द केले.

याविषयी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे पोलीस शिपाई विशाल बोराडे यांनी तक्रार दिली. या प्रकरणी अब्दुल हमीद करीम सय्यद, आबिद अब्दुल करीम सय्यद, अत्तर अब्दुल करीम सय्यद, शुरू कल्याणी, बबलू सलीम शेख, वसीम पीर अहमद माकतल, इब्राहीम अलीम करीम सय्यद, वाहब अब्दुल करीम सय्यद या धर्मांधांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केले म्हणून आणि अन्य कलमांन्वये गुन्हे नोंद केले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *