- देवाला सात्त्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अपेक्षित आहे, तसेच देव मानव नसल्याने त्याला मानवाला होतो, तसा उष्णतेचा त्रास होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे !
- हिंदूंसह पुजार्यांनाही धर्मशिक्षण नसल्यामुळे ते अशी अयोग्य कृती करून भाविकांसमोर अयोग्य पायंडा पाडतात !
वाराणसी (उत्तरप्रदेश) : वाढत्या उष्णतेमुळे वाराणसीतील बाबा बटुक भैरव मंदिरात पुजार्यांकडून देवाला शीतपेय आणि चॉकलेट्स यांचा नैवेद्य दाखवला जात आहे. भगवान शंकराच्या ८ रूपांपैकी एक असलेल्या बाबा बटुक भैरव यांच्या मंदिरात शिवशंकराच्या बाल स्वरूपाची पूजा करण्यात येते. देवाला उष्णतेचा त्रास होऊ नये; म्हणून या मंदिरात वातानुकूलित यंत्र, पंखे आणि एक्झॉस्ट फॅनही लावण्यात आले आहेत. अशीच व्यवस्था येथील इतर मंदिरांत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात