पाकला आता इस्लामी राष्ट्रेही भीक घालत नाहीत. यावरून त्याची लायकी लक्षात येते !
नवी देहली : संयुक्त राष्ट्रामध्ये इस्लामोफोबियावर (इस्लामविषयी भीती निर्माण करणे) इस्लामिक सहयोग संघटनेच्या राजदूतांचा एक अनौपचारिक गट बनवण्याची पाकचा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरात आणि मालदीव या इस्लामी देशांनी धुडकावून लावला. भारतीय मुसलमानांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप करत पाकने हा प्रस्ताव मांडला होता.
१. पाकच्या डॉन या वृत्तपत्राने राजकीय नेत्याच्या सूत्राच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी इस्लामिक सहयोग संघटनेच्या प्रतिनिधींच्या ऑनलाईन बैठकीत इस्लामोफोबियाचे सूत्र उपस्थित करून एक गट बनवण्याची मागणी केली; मात्र संयुक्त अरब अमिरात आणि मालदीव या इस्लामी देशांनी ही मागणी फेटाळून लावली.
२. अक्रम यांनी भारतीय मुसलमान आणि काश्मिरी लोक यांच्याविषयी चिंता व्यक्त करत म्हटले की, सत्ताधारी भाजपकडून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. (भारतामध्ये काय होत आहे, यापेक्षा पाकमध्ये अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांविषयी पाकने लक्ष द्यायला हवे. आता भारतानेच पाकमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचाराविषयी संयुक्त राष्ट्रामध्ये आवाज उठवला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात इस्लामोफोबिया अधिक मोठ्या प्रमाणावर समोर आला आहे. काश्मीरमध्ये काश्मीरच्या बाहेरील लोकांना वसवण्यास अनुमती देण्यात आली आहे. मोदी सरकार तेथील लोकसंख्येची रचनाच पालटण्याचा प्रयत्न करत आहे.
३. यावर मालदीवचे राजदूत थिलमीजा हुसेन म्हणाले की, भारतावर इस्लामोफोबियाचा आरोप करणे तथ्यात्मकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. यामुळे दक्षिण आशियातील सौहार्दाला हानी पोचू शकते.
४. संयुक्त अरब अमिरातचे राजदूत म्हणाले की, याविषयी अनौपचारिक गट बनवण्याविषयी सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्रीच निर्णय घेऊ शकतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात