Menu Close

वसई तालुक्यातील शिवमंदिरात एका साधूंवर आक्रमण करून चोरी : तिघांना अटक

पालघर जिल्ह्यातील साधूंवर आक्रमण होण्याचे सत्र चालूच !

  • साधू-संतांवर वारंवार आक्रमण आणि त्यांच्या हत्या होण्याच्या घटना या संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राल कलंकित करणार्‍या आहेत !
  • हिंदूंच्या मंदिरांचे, साधू-संतांचे आणि सर्वत्रच्या हिंदूंचे रक्षण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव पर्याय आहे !

ठाणे : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने साधूंची हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता याच जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एका जागृत शिवमंदिरात एका साधूंवर आक्रमण करून मंदिरात चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१. मुंबई-कर्णावती (अहमदाबाद) मार्गाजवळील भालीवली गावात जागृत महादेव मंदिर आहे. २८ मेच्या रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ३ जणांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम, तसेच तांब्याची भांडी चोरली.

२. चोरांनी मंदिरातील साधूंवर मंदिरात असलेल्या शिवाच्या त्रिशूळाने आक्रमण केले. या साधूंनी मंदिरातील एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेतले असता आक्रमणकर्त्यांनी या खोलीच्या दरवाजाची मोडतोड करून खिडकीच्या काचा फोडून साधूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी साधूंनी शेजारील ग्रामस्थांना संपर्क करून बोलवले. ग्रामस्थांनी एका आक्रमणकर्त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, तर दोघेजण पसार झाले होते.

३. विरार पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

४. पालघरमध्ये साधूंवर आक्रमण होणे, ही गंभीर गोष्ट असून यामागे नेमकी कोणती मनोवृत्ती आहे ?, याचा अभ्यास करून त्या दिशेने कारवाई करत आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून होत आहे. (हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासन स्वत:हून या प्रकरणांच्या मुळाशी का जात नाही ? यावरून हिंदूंना कुणी वाली उरला नाही, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक,  दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *