पणजी : गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले. ज्यांनी याला विरोध केला, त्यांना एकतर ठार मारण्यात आले किंवा त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात आली. गोव्यातील हिंदूंवर झालेले हे अत्याचार धर्माभिमानी हिंदूंकडून ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा जगासमोर आले. ३० मे या दिवशी ट्विटरवर #Stop_Conversions आणि #Goa_Inquisition या ‘हॅशटॅग’द्वारे ‘ट्रेंड’ चालू केला. यातील #Stop_Conversions हा ट्रेंड चौथ्या, तर #Goa_Inquisition हा ट्रेंड ११ व्या स्थानी होता. यावर अनेक जणांनी ट्वीट करून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
१. गोवा ‘इन्क्विझिशन’ एक काळा इतिहास आहे जो हिंदूच्या रक्ताने लिहिला गेला आहे. इतिहासामध्ये ‘स्पॅनिश इन्क्विझिशन’विषयी सांगितले जाते; मात्र दुर्दैव आहे की, गोव्यामधील नरसंहाराविषयी काहीही सांगितले जात नाही.
२. या नरसंहाराविषयी पोप यांनी क्षमा मागितली पाहिजे. यावर कॅथॉलिक चर्च कधी क्षमा मागणार ?
३. गोव्यातील हिंदूंवरील अत्याचारांचा साक्षी असणारा येथील ‘हातकातरो खांब’ दुर्लक्षित आहे. पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देऊन त्याला ‘संरक्षित स्मारका’चा दर्जा दिला पाहिजे.
४. आपल्याला गर्व असला पाहिजे की, गोमंतकियांनी ख्रिस्ती मिशनर्यांचे अत्याचार सहन केले, बलीदान केले; पण धर्मांतर केले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात