- ६ मासांपूर्वीही तोडफोड केल्यावर धर्मांधांवर कोणतीही कारवाई न झाल्याचा परिणाम !
- बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे यांवर सातत्याने आक्रमणे होतच आहेत; मात्र याविषयी भारतातील एकही निधर्मीवादी नेता तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील लाक्षादिया गावामध्ये २१ मे या दिवशी एका धर्मांधास कालीमातेच्या मंदिरात बसून गांजा ओढण्यास मनाई करण्यात आल्याने, तसेच त्याला मंदिरासमोर लघुशंका करण्यास विरोध केल्याने त्याने मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड केली. या घटनेची चौकशी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून करण्यात येत आहे.
१. मंदिर समितीचे सदस्य श्री. दूरजय मंडल यांनी पोलीस ठाण्यात धर्मांध महंमद रकीब याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने पोलीस ठाण्याच्या अधिकार्याशी संपर्क केला असता वरील घटनेची नोंद घेतली असली, तरी आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे सांगितले.
२. श्री. दूरजय मंडल यांनी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या सदस्यांना सांगितले की, महंमद रकीब आणि साजिब हे दोघे नेहमी मंदिराच्या समोर बसून गांजा आणि इतर अमली पदार्थ यांचे सेवन करायचे. ६ मासांआधीही या दोघांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली होती; मात्र पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कुठलीच कारवाई केली नव्हती. (यावरून बांगलादेशात हिंदूंच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. ‘बांगलादेश मायनॉरिटी वाच’ने या घटनेचा तीव्र निषेध करून आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच ‘देशाच्या घटनेनुसार अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळाचे रक्षण करण्याच्या दायित्वाचे सरकारने पालन करावे’, अशी मागणीही केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात