Menu Close

भारतावर पाक आणि बांगलादेश मार्गे आक्रमण करण्याचा इसिसचा कट !

हिंदूंवर आक्रमण करण्याची प्रथमच धमकी !

हिंदूंनो, इसिसचे आक्रमण परतवून लावण्यासाठी संघटित होऊन स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

isis_imनवी देहली : इसिसने भारतावर बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्या बाजूने गनिमीकाव्याद्वारे आक्रमण करण्याचा कट रचला आहे. (पठाणकोटमधील वायूदल केंद्राचे रक्षण करू न शकणारे केंद्रातील शासन इसिसपासून भारताचे रक्षण करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) इसिसने दाबिक या ऑनलाईन मासिकाच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे. यात प्रथम हिंदूंना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हिंदूंना आणि इस्लामला न मानणार्‍यांना ठार करून बांगलादेशात शरीया लागू करणार असल्याचे म्हटले आहे. (आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍या ढोंगी निधर्मीवाद्यांना चपराक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

भारतावर आक्रमण करून बांगलादेशात इसिसचा गड बनवण्याचा आतंकवाद्यांचा कट आहे. भारतावर आक्रमण करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन इसिसला सहकार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.

१. बांगलादेशमधील इसिसचा प्रमुख शेख अबू इब्राहिम अल-हनीफ याची एक मुलाखत दाबिकमध्ये प्रकाशित झाली आहे. यात अबूने भारतातील हिंदूंना पहिल्यांदा खुले आव्हान दिले आहे. तो म्हणाला की, भारतात हिंदूंनी इस्लामच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. भारतात मुसलमान समाजाला हिंदू लक्ष्य करत आहेत. बांगलादेशातही काही मुसलमान इस्लामच्या विरोधात काम करत आहेत. (चोरांच्या उलट्या बोंबा ! भारतात अल्पसंख्यांक धर्मांधच हिंदूंवर आक्रमण करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. बांगलादेशातील शेख हसीना यांच्या शासनावर टीका करतांना अबूने म्हटले की, येथील निधर्मी शासनामुळे उच्च पदांवर हिंदूंच्या नियुक्त्या होत आहेत, ज्या चुकीच्या आहेत. बांगलादेशात रहाणारे हिंदू भारतीय गुप्तचर संस्था रॉला साहाय्य करत आहेत आणि मुसलमानांच्या विरोधात माहिती देत आहेत.

३. अबूने पुढे म्हटले की, बांगलादेश जमात-ए-इस्लामी पक्षाने गाईची पूजा करण्याच्या गोष्टी करणार्‍या नरेंद्र मोदी शासनाच्या विजयावर त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पक्ष सातत्याने हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होतांना दिसत आहे. पक्ष इस्लामच्या विरोधात कार्य करत आहे. याचा पक्षाला तोटा सहन करावा लागेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *