- ‘चीनने पाकचा सहकारी होऊन भारताच्या विरोधात कारवाई केली, तर परिणाम वाईट होतील’, अशी धमकी भारताने कधी दिली आहे का ?
- चीनच्या अशा धमक्यांना भारताने भीक न घालता चीनच्या विरोधात जे करता येईल, ते करणे आवश्यक आहे !
- सक्षम अर्थव्यवस्था, हे चीनचे बलस्थान आहे. त्याद्वारे तो भारतावर, तसेच जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे. हे लक्षात घेऊन भारताने चिनी मालावर निर्बंध लादणे आवश्यक !
बीजिंग (चीन) : भारताने अमेरिकेचा सहकारी होऊन जर चीनच्या विरोधात कोणतीही कारवाई केली, तर कोरोना महामारीच्या या परिस्थितीत आर्थिक परिणाम वाईट होतील, अशी धमकी चीनने त्याचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’च्या माध्यमातून भारताला दिली आहे. कोरोनामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध चालू झाले असतांना दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक घट्ट होत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनने ही धमकी दिली आहे.
ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे की,
१. भारताने अमेरिका आणि चीन यांमधील शीतयुद्धापासून दूर रहावे जेणेकरून दोन्ही देशांमधील व्यवहारिक संबंध पुढेही चालू रहातील.
२. कोणत्याही परिस्थितीत राजकीय कारणांमुळे भारताला आर्थिक परिणाम सहन करावे लागू नयेत, यासाठी चीन प्रयत्न करत आहे. यामुळे मोदी सरकारला भारत-चीन संबंधांविषयी सकारात्मक विचार करत पुढील वाटचाल केली पाहिजे.
३. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्या वादात मध्यस्थी करण्याचे म्हटले होते. त्यावर या लेखात म्हटले आहे की, दोन्ही देशांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या साहाय्याची आवश्यकता नाही. भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यात सक्षम आहेत. शांतता बिघडवण्याची संधी शोधणार्या अमेरिकेपासून दोन्ही देशांनी सावध राहिले पाहिजे.
४. भारतासमवेत व्यवहारिक संबंध चांगले ठेवणे आमचे लक्ष्य आहे. यामुळे चीन यापुढेदेखील भारतात गुंतवणूक करण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्यास उत्सुक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात