Menu Close

हिंदूंच्या साधू-संतांवरील आक्रमणांचे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवावे !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

संभाजीनगर : एकीकडे कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला असतांना भारतात हिंदू साधू-संत यांच्यावर आक्रमण होण्याच्या घटना घडत आहेत. पालघर येथील २ साधूंच्या अमानुष हत्येची बातमी दुर्लक्षित होत असतांनाच संपूर्ण भारतभरात हिंदू साधू-संतांच्या हत्या आणि त्यांच्यावरील आक्रमणे घडतच आहेत. देशातील साधू-संतांच्या हत्यांची सखोल चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) होण्यासाठी आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी संभाजीनगर उच्च न्यायालयात कार्यरत, तसेच ‘बार असोशिएशन’चे सचिव आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक पत्र लिहून केली आहे.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की,

१. या घटना घडत असतांना देशातील सर्व तथाकथित विवेकवादी, मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढणारे आणि छद्म-धर्मनिरपेक्षतावादी कुठे गेले आहेत ? ते साधूंच्या भयंकर हत्या आणि आक्रमण यांचा निषेध कधीच करत नाहीत. यापूर्वी आम्ही काही तथाकथित बुद्धिवंतांना पुरस्कार परत करतांना पाहिले आहे. हे लोक कोणत्याही कारणास्तव आणि हिंदूंशी संबंधित नसतांनाही हिंदूंचा निषेध करतात.

२. देशातील कोणत्याही संकटकाळी त्याग करण्यास हिंदू नेहमीच आघाडीवर असतात. तरीही त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती मंदिराच्या मालकीच्या मालमत्ता विक्रीस काढण्यात येतात. उघडपणे गोहत्या केल्या जातात. गोवंशाची चोरटी वाहतूक करतांना रोखणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील रामेश्‍वर पारचांडे या पोलिसाची वाहनाद्वारे चिरडून हत्या केली जाते. या सर्व घटनांमागे हिंदुविरोधी कट असल्याचा संशय येतो. तरी साधू-संत यांच्या हत्यांची सखोल चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून होण्यासाठी आवश्यक ते आदेश द्यावेत.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्रात देशात नुकत्याच घडलेल्या साधू-संतांच्या हत्या आणि त्यांच्यावरील आक्रमणाची प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेली काही उदाहरणे दिली आहेत.

१. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका मंदिरात २ पुरोहितांचे छिन्नविछिन्न केलेले मृतदेह सापडले.

२. २४ एप्रिल या दिवशी होशियारपूरमध्ये स्वामी पुष्पेंद्र स्वरूप यांच्यावर प्राणघातक आक्रमण

३. हरियाणाच्या कनिना बसस्थानकाच्या मागे असलेल्या स्मशानभूमीत एका भिक्षूचा  नग्न अवस्थेत पडलेला मृतदेह

४. महाराष्ट्रातील नांदेडच्या उमरी तालुक्यातील नागठाणा येथे बाल ब्रह्मचारी साधू शिवाचार्य यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

५. पंजाबमध्ये ८० वर्षीय संतांची हत्या

६. बिहारच्या किशनगंजमध्ये एका कुटुंबाने आरोप केला आहे की, ते हिंदू देवतांची उपासना करतात; म्हणून ‘भीम आर्मी’ने त्यांच्यावर आक्रमण केले आणि स्थानिक मंदिराची तोडफोड केली.

७. वृंदावनमध्ये साधू तमल कृष्णदास यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *