-
गुन्हा नोंद होताच नेते पसार
-
पोलीस ठाण्यातच दिली धमकी
- माकपच्या अशा गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांविषयी देशातील एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, साम्यवादी, पुरस्कार वापसी टोळीतील लोक बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
- केरळमध्ये माकपच सत्तेवर असल्याने त्यांच्या पदाधिकार्यांकडून पोलिसांना धमकावण्याचा प्रकार आश्चर्यकारक म्हणता येणार नाही; कारण माकपचा इतिहासच गुंडगिरी आणि हिंसाचारी आहे. माकपचीच सत्ता असल्याने या पदाधिकार्यांवर पोलिसांकडूनही कारवाई होणे अशक्य आहे, हेही तितेकच खरे !
कुमिली (इडुक्की, केरळ) : राज्यातील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (‘माकप’च्या) नेत्यांनी वंदीपेरियार पोलीस ठाण्यातील पोलिसांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी माकपच्या इडुक्की जिल्हा सचिवालयाचे सदस्य आर्. थिलकन्, पिरमेदुचे क्षेत्र सचिव जी. विजयानंद आणि रेनिल यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वतःची अटक टाळण्यासाठी हे नेते पसार झाले आहेत. या तिघांवर प्रथम केवळ किरकोळ गुन्हे नोंदवण्यात आले होते; मात्र लोकांच्या मागणीनंतर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. या तिघांकडून सध्या केरळ उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
(सौजन्य : Mathrubhumi News)
१. २७ मे या दिवशी दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ‘डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ (डी.वाय.एफ्.आय.) या संघटनेच्या सदस्यांचे दुचाकी वाहन कह्यात घेतले. वाहन परत करण्याची मागणी करत माकपचे नेते पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस अधिकार्यांशी बोलतांना आरडाओरडा केला आणि ‘आम्ही तुमच्या घरात घुसून तुमच्यावर आक्रमण करू’, अशी थेट धमकी दिली. यानंतर सदर पोलीस अधिकार्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना याविषयी माहिती दिली; मात्र तरीही माकपच्या नेत्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.
२. माकपच्या नेत्यांकडून पोलीस अधिकार्यांना धमकावण्यात येत असल्याचा एक ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झालो, तसेच वृत्तवाहिन्यांवरही हे वृत्त दाखवण्यात आले आहे. त्यानंतर २९ मे या दिवशी माकपच्या वरील नेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.
३. आता या नेत्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यास साहाय्य व्हावे, यासाठी पोलीस त्यांना अटक करण्यास विलंब करत असल्याचा आरोप केला जात आहे. (पोलीस स्वतःच्याच सहकारी पोलिसांना धमकी देणार्या आरोपींना अटक करण्यात टाळाटाळ करत असतील, तर पीडित सामान्य लोकांच्या बाबतीत ते कसे वागत असतील ?, याचा विचारच न केलेला बरा ! गुंडांना अटक करण्यास उशीर करणार्या संबंधित पोलिसांवरही कारवाई होण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
४. माकपचे जिल्हा सचिव के. जयचंद्रन् म्हणाले की, ‘जिल्हा समितीने या प्रकरणात सहभागी असलेल्या पदाधिकार्यांना सर्वांसमोर ताकीद देण्याचा निर्णय घेतला आहे.’ (पोलिसांना ठार मारण्याची धमकी देणार्यांना केवळ ताकीद देऊन सोडून देणारे माकपवाले निरपराध हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘आतंकवादी’ ठरवून त्यांना फाशी देण्याची मागणी करत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात