Menu Close

पाकमधील ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर

मुसलमानांशी निकाह करण्यास भाग पाडले

  • पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर, अन्याय, अपहरण, धर्मांतर, बलात्कार होऊनही कुठल्याही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला हेे दिसत कसे नाही ?
  • पाकमध्ये नरकयातना भोगणार्‍या अल्पसंख्य हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार का ?

इस्लामाबाद : पाकमधील सिंध प्रांतात ३ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याची आणि त्यांना मुसलमान युवकांशी निकाह करण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली. अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिली.

१. पहिली घटना सिंध प्रांताच्या दक्षिण भागात असलेल्या टंडो महंमद खान नावाच्या जिल्ह्यात घडली. तेथील एका मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपरण करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केल आणि नंतर तिच्याशी बलपूर्वक निकाह केला.

२. दुसरीही घटना याच जिल्ह्यात घडली. येथे एका मुसलमान तरुणाने एका १५ वर्षीय हिंदु मुलीला शस्त्राचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर मौलवींनी तिचे बलपूर्वक धर्मांतर करून अन्य एका मुसलमान तरुणाशी तिचा निकाह लावून दिला.

३. तिसरी घटना सिंधमधील मीरपुरखास येथील आहे. तेथीही अशाच प्रकारे एका मुसलमान तरुणाने  एका अल्पवयीन हिंदु मुलीचे शस्त्राच्या बळावर अपहरण करून तिचे धर्मांतर केले. याविरोधात तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यावर आरोपींनी भगवंतीच्या वडिलांना ‘तुम्ही तुमच्या मुलीला परत घेऊन जाण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही तिची हत्या करू; कारण एकदा इस्लाम स्वीकारल्यानंतर तो सोडल्यास, त्यास मृत्यू हीच शिक्षा आहे’, अशा शब्दांत धमकी दिली.

सिंध प्रांतात प्रत्येक वर्षी होते १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर !

अमेरिकेतील ‘सिंधी फाऊंडेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘पाकच्या सिंध प्रांतात प्रत्येक वर्षी १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात येते. या मुली १२ ते २८ या वयोगटांतील असतात. अपहरण केल्यानंतर मौलवी हिंदु मुलींचा निकाह मुसलमाना तरुणांशी लावून देतात.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *