Menu Close

मेरठ : हिंदु नाव धारण केलेल्या धर्मांधाकडून हिंदु युवतीशी विवाह करून तिची अमानुष हत्या

हिंदु युवतीचे डोके आणि हात-पाय कापून ते तलावात फेकले

  • हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना फसवणार्‍या आणि त्यांची हत्या करणार्‍या अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक !
  • ‘प्रेमाच्या आड धर्म येत नाही’, असे सांगणारे निधर्मीवादी हिंदु नाव धारण करून हिंदु युवतींना फसवणार्‍या आणि त्यांची हत्या करणार्‍या अशा धर्मांधांविषयी काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • लव्ह जिहादच्या असल्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक !

मेरठ (उत्तरप्रदेश) : दौराला येथील लाहिया गावामध्ये शाकिब नावाच्या धर्मांधाने एकता नावाच्या हिंदु मुलीशी विवाह केला. त्यानंतर कुटुंबियांच्या साहाय्याने तिला थंड प्येयामध्ये बेशुद्ध पडण्याचे औषध दिले. ती बेशुद्ध पडल्यावर तिच्या शरीराचे तुकडे केले. मृतदेहाचे हात, पाय आणि डोके तलावात फेकले, तर धड जंगलात फेकले.

शाकिब याने स्वतःचे अमन असे हिंदु नाव सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर एकता घरातून १५ लाख रुपये आणि १५ तोळे सोने घेऊन पळून गेली आणि तिने शाकिब याच्याशी विवाह केला. एकता हिच्याकडील पैशांसाठीच शाकिब हिने तिचा खून केल्याचे पुढे येत आहे. ही घटना एक वर्षांपूर्वी घडली होती. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनंतर एक वर्षाने या प्रकरणाचा छडा लागला आहे.

एकता हिला आरोग्याच्या काही समस्या असल्यामुळे ती तांत्रिक असणार्‍या शाकिब याच्याकडे गेली होती. त्या वेळी शाकिब याने स्वतःचे नाव ‘अमन’ असे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकता हिची हत्या केल्यानंतर शाकिब तिचा भ्रमणभाष वापरत होता. तोे एकताच्या नावाने तिच्या कुटुंबियांना व्हॉट्स अ‍ॅप द्वारे संदेश पाठवत असे. तसेच तिच्या कुटुंबियांनी ‘फेसबूक’वर काही ‘मेसेज’ ‘पोस्ट’ केल्यास शाकिब त्यास उत्तरही देत असे. त्यामुळे एकता हिच्या कुटुंबियांना ‘ती जिवंत आहे’, असेच वाटत होते. २० मे २०२० या दिवशी पोलिसांनी एकता हिच्या कुटुंबियांशी संपर्क साधल्यावर सत्य समोर आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *