- किती हिंदू स्वतःच्या धर्माच्या विरोधात काही घडत असेल, तेव्हा अशी जागरूकता दाखवतात ?
- कुठे खेळामधील स्वधर्माच्या विरोधातील गोष्टही खपवून न घेणारे जागरूक मुसलमान, तर कुठे खेळ, नाटक, सिनेमा, कला इत्यादींमध्ये केल्या जाणार्या देवतांच्या विडंबनाला हसून आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देणारे धर्माभिमाशून्य हिंदू !
रियाध (सौदी अरेबिया) : ‘पबजी’ या ‘व्हिडिओ’ खेळाच्या नवीन आवृत्तीमध्ये मूर्तीपूजेचा समावेश केल्यामुळे कुवेत आणि सौदी अरेबिया येथे धार्मिक वाद निर्माण झाला आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा अमान्य असल्याने येथील धर्मगुरूंनी त्यास विरोध केला आहे.
१. ‘पबजी’ने ‘मिस्टीरियस जंगल मोड’ नावाने एक नवी आवृत्ती (व्हर्जन) प्रसिद्ध केली आहे. यात खेळाडू मूर्तीपूजा करतांना दिसत आहेत. यामुळे कुवेतमधील मुसलमान धर्मगुरूंनी यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. त्यांनी ‘अशा प्रकारच्या इस्लामविरोधी विचारांपासून मुलांना वाचवा’, अशी मागणीही प्रशासनाकडे केली आहे.
२. या खेळामध्ये ‘टोटेम्स’ नावाची शक्तीशाली मूर्ती आहे आणि त्याची पूजा करून खेळाडू पुन्हा सशक्त होतो, तसेच त्याला ‘एनर्जी ड्रिंक’ आणि ‘हेल्थ किट’सारख्या अनेक गोष्टी मिळतात’, असे दाखवण्यात आले आहे. पबजी खेळणारे अनेक मुसलमान या नव्या आवृत्तीला विरोध करत आहेत. अनेक जण ‘टोटेम्स’ मूर्तीला खेळामध्ये जाळून संताप व्यक्त करत आहेत.
३. कुवेत विद्यापिठातील शरिया महाविद्यालयामधील प्रा. डॉ. बासम अल शट्टी यांनी सांगितले की, ‘पबजीने मूर्ती पूजेच्या माध्यमातून इस्लामी मान्यतांचेच उल्लंघन केले आहे. हे इस्लाममधील सर्वांत मोठे पाप आहे. इस्लाममध्ये केवळ शक्तीशाली अल्लाच्या प्रार्थनेमध्ये माथा झुकवला जातो.
४. ‘बेसिक एजुकेशन कॉलेज’चे प्रा. डॉ. राशिद अल अलीमी यांनी म्हटले की, हा खेळ मुसलमानांसाठी अत्यंत धोकादायक आहे. यांसारखे खेळ पुढे अशा पिढ्या निर्माण करतील, ज्यांना इस्लामचा अपमान करणार्या सिद्धांतांच्या संदर्भात काहीच ठाऊक नाही. इस्लामचा एकेश्वरवादावर विश्वास आहे. अल्ला हाच सृष्टी बनवणारा आणि तिचे रक्षण करणारा आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात