कोल्हापूर : १३ एप्रिलला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या मुसलमान महिला सहकार्यासह मंदिराच्या गाभार्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करणारे प्रसिद्धी पत्रक हिंदु जनजागृती समितीने काढले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की,
१. १३ एप्रिलला तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात घुसून दर्शन घेण्यासाठी जे आंदोलन केले होते, या आंदोलनासाठी तिने स्वतःसोबत पुण्यातून काही स्त्री-पुरुषांना आणले होते.
२. पोलिसांनी जमावबंदीची नोटीस देऊन या आंदोलकांना अटक केली. या अटक झालेल्या कार्यकर्त्यांची नावे अनेक दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. यात अतिशय धक्कादायक गोष्ट उघड झाली, ती म्हणजे तृप्ती देसाई यांच्यासोबत आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये भूमाता ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सलीमा गुलाब मुल्ला या मुसलमान महिलेचाही समावेश होता.
३. पोलिसांनी जर त्यांना कह्यात घेतले नसते, तर तृप्ती देसाई या मुसलमान महिलेला घेऊन गाभार्यात घुसल्या असत्या आणि श्री महालक्ष्मी मंदिर धर्मभ्रष्ट केले असते.
४. या घटनेवरून तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाची भूमिकाच स्पष्ट होत असून त्यांना धर्मपरंपरांच्या विरोधात जाऊन केवळ गाभार्यात प्रवेश नको असून प्रत्यक्षात हिंदु धर्म भ्रष्ट करण्याचे तिचे षड्यंत्र आहे.
५. ही गोष्ट कोल्हापूरमधील सर्व श्री महालक्ष्मी भक्तांना अत्यंत खटकलेली असून यासंदर्भात शासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहोत.
६. तसेच तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाला धन आणि मनुष्यबळ कोठून पुरवले जाते, याचाही शोध आता घेण्याची वेळ आली आहे.
७. तृप्ती देसाई यांना मुसलमान महिलेला हिंदु मंदिराच्या गाभार्यात घेऊन जाण्याची एवढीच हौस असेल, तर त्यांनी आधी त्या मुसलमान महिलेला घेऊन हाजी अलीच्या दर्ग्यात अशाच पद्धतीने घुसून दाखवावे, असे आव्हान श्री. घनवट यांनी केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात