अमरावती : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन २९ मे या दिवशी साजरा करण्यात आला. ‘राणी लक्ष्मीबाई यांच्यामध्ये असलेले शौर्य आणि धर्मप्रेम आजच्या युवतींमध्ये जागृत व्हावे’, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मप्रेमी सौ. अर्चना मावळे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनातील शौर्याचे प्रसंग सांगून युवतींमधील क्षात्रतेज आणि मनोबल जागृत केले. या वेळी कु. प्रियांका निंघोट यांनी पुढाकार घेऊन राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. वर्धा जिल्ह्यातील सौ. वेदश्री येळणे यांनी ‘खूब लडी मर्दानी, वह तो झांसीवाली रानी थी ।’ ही कविता म्हटली. ‘झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात वर्धा, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर आणि अमरावती येथील ५० युवती ‘ऑनलाईन’ उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात