Menu Close

वाद्यांच्या गजरांत श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मार्गस्थ !

उज्जैन सिंहस्थपर्व

peshwai
उज्जैन – उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

१. सकाळी १० वाजता हरसिद्धी मार्गावरील चारधाम मंदिर परिसरापासून श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मिरवणूक वाद्यांच्या गजरात आणि उपस्थित संतमहंतांवर पुष्पवृष्टी होत आरंभ झाली.\

२. या मिरवणुकीत चारधाम मंदिराचे प्रमुख स्वामी महामंडलेश्‍वर शांतिस्वरूपानंद गिरी यांच्यासह ४० पेक्षा अधिक महामंडलेश्‍वर तसेच शेकडो संत, महंत आणि नागा साधू सहभागी झाले होते. नागा साधूंनी शस्त्रास्त्रे चालवण्याचे काही प्रकार मिरवणुकीत करून दाखवले.

३. मिरवणुकीच्या सर्वांत पुढे आखाड्याचे निशाण, ध्वज आणि भाले होते. हत्ती, घोडे, ऊंट आणि विविध वाद्यपथकांनी सुशोभित अशा या पेशवाईचे ठिकठिकाणच्या चौकात नागरिकांनी भक्तीभावाने आणि उत्साहाने स्वागत केले.

४. पेशवाईची मिरवणूक बघण्यासाठी भक्तगण आणि नागरिक यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती आणि ते साधू-संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांना भक्तीभावाने वंदन करत होते. संत-महंतही त्यांना आशीर्वाद देत होते, तसेच भक्तांवरही ते पुष्पवर्षाव करत होते. काही संत फळांचाही वर्षाव करत होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीकडून स्वागत

मिरवणुकीच्या मार्गाच्या ठिकाणी सनातन संस्थेचे साधक तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी स्वागताचे फलक धरून सर्वांचे स्वागत केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *