हिंदुद्वेषाने पीडित ग्रीकमधील ख्रिस्ती चर्चसंस्था !
• ‘तणावग्रस्त जीवन जगू; परंतु हिंदु धर्माशी संबंधित ‘योग’ नको’, अशी मानसिकता असलेली चर्चसंस्था !
• याविषयी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काही बोलत का नाहीत ?
अथेन्स (ग्रीक) : ‘योगासनांना ख्रिस्त्यांच्या जीवनात स्थान नाही’, अशी घोषणा ग्रीक चर्चच्या धर्मसभेने नुकतीच केली. ग्रीकमध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमवीवर ग्रीकमधील प्रसारमाध्यमांनी ‘तणाव अल्प करण्याचे माध्यम म्हणून ‘योगा’चा अवलंब करावा’, असा सल्ला दिला होता. त्याला अनुसरून चर्चने ही घोषणा केली आहे. ‘योग’ हा शारीरिक व्यायामाचा प्रकार नाही, तर तो हिंदु धर्माचा मूलभूत अध्याय आहे. ‘योग’ ख्रिस्ती धर्माशी पूर्णपणे विसंगत आहे’, असा निर्णय अथेन्सच्या आर्चबिशपच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत घेण्यात आला.
१. वर्ष २०१५ पासून चर्च ‘योगा’ला कडाडून विरोध करत आहे. गेल्या वर्षी अर्गोलिसच्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी प्राचीन हिंदु पद्धती असलेला ‘योग’ धोकादायक असल्याचे म्हटले होते.
२. ‘जगभरातील ३० कोटींपेक्षा अधिक लोक ‘योग’ करतात. योगामुळे शारीरिक आणि मानसिक लाभ होत असल्याने तो जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरला आहे’, असा ‘आंतरराष्ट्रीय योग परिषदे’चा दावा आहे. संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून स्वीकारला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात