पोलिसांकडून ‘अपघाती मृत्यू’ असल्याचे सांगण्याचा प्रयत्न
- मुसलमानबहुल बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी किंवा तथाकथित मानवाधिकार संघटना पुढे येत नाहीत, हे लक्षात घ्या !
- जगभरातील इस्लामी देश, त्यांच्या संघटना भारतात मुसलमानांवर अन्याय होत नसतांनाही याविषयी बोलत असतात. आता ‘भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर खर्या अर्थाने होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे’, असे हिंदूंना वाटते !
ढाका (बांगलादेश) : गोपाळगंजच्या कोटालीपारा येथील निखिल कर्माकर नावाच्या एका शेतकर्याला पोलिसांनी मारहाण केल्याने त्याच्या पाठीचा कणा ३ ठिकाणी मोडला. त्यांच्यावर ढाका येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २ जून या दिवशी घडली.
१. निखिल कर्माकर त्यांच्या मित्रांसमवेत रामशिल बाजारात पत्ते खेळत असतांना कोटालीपारा पोलीस घटनास्थळी पोचले. पोलीस येताच त्याचे मित्र पळून गेले; मात्र निखिल कर्माकर यांना साहाय्यक उपनिरीक्षक शमीम उद्दीन यांनी पकडले. त्यानंतर शमीम यांनी निखिल याला मारहाण केली. यात त्याच्या पाठीचा कणा ३ ठिकाणी तोडला.
२. पोलीस उपनिरीक्षक शमीम उद्दीन म्हणाले की, मी याविषयावर भाष्य करणार नाही. माझ्याविषयी काही प्रश्न असल्यास प्रभारी अधिकार्यास विचारू शकता.
३. कोटलीपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणाले की, ‘माझ्या माहितीनुसार निखिल झाडावरून खाली पडल्याने गंभीर घायाळ झाला आणि उपचार चालू असतांनाच त्याचा मृत्यू झाला.’
४. गोपाळगंजचे पोलीस अधीक्षक महंमद सैदूर रहमान खान म्हणाले की, ‘माझ्या माहितीनुसार निखिल याचा मृत्यू अपघाती आहे. आमच्याकडे पोलिसांच्या अत्याचाराची कोणतीही तक्रार आलेली नाही; मात्र तक्रार आल्यास आम्ही या घटनेची नक्कीच चौकशी करू.’ (बांगलादेशी पोलीस कसा बनाव करून स्वतःची कातडी वाचवत आहेत, हे यातून दिसून येते. बांगलादेशात तेथील सरकार, पोलीस आणि प्रशासन यांनी हिंदूंना वार्यावर सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचे दायित्व आता भारत सरकारने घेणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. निखिलचे शेजारी म्हणाले की, ‘निखिल सज्जन माणूस होता. पोलीसच जर अशा प्रकारच्या गुन्ह्यांत गुंतले असतील, तर आम्ही न्यायासाठी कोठे जाऊ ?’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात