- कोणत्याही अन्य प्राण्यांच्या शरिरातील नव्हे, तर गायीच्या शरिरातील रोगप्रतिकार शक्तीद्वारे कोरोनावर मात करता येऊ शकते, हे विदेशींच्या लक्षात आले; पण भारतियांच्या लक्षात कधी येणार ?
- भारतात प्रतिदिन लाखो गोहत्या होत असतांना उद्या त्या औषधाला तरी शिल्लक रहाणार आहेत का ?
नवी देहली : अमेरिकेतील औषधांचे उत्पादन करणार्या ‘सॅब बायोथेराप्यूटिक्स’ या आस्थापनाने ‘गायीच्या शरिरातील ‘अँटीबॉडीज’ (रोगप्रतिकार शक्ती) कोरोनाबाधितांवर गुणकारी ठरू शकेल’, असा दावा केला आहे.
Could cows be the secret weapon to finding a treatment for #COVID19? Our newest #BeyondImagination feature at @BIOConvention’s #BIODigital highlights @SABBantibody and its work to produce human polyclonal antibodies in cows. pic.twitter.com/nwGqVXqipM
— I Am Biotech (@IAmBiotech) June 8, 2020
१. या आस्थापनाने सांगितले की, ‘अनुवांशिक पालट करण्यात आलेल्या गायींच्या शरिरातून ‘अँटीबॉडीज’ काढून कोरोना विषाणूवर मात करणारे औषध बनवण्यात येत आहे. या औषधाची वैद्यकीय चाचणी लवकरच करण्यात येणार आहे.’
२. ‘अँटीबॉडीज’ची तपासणी प्रयोगशाळेत पेशी किंवा तंबाखूच्या झाडावर करतात. ‘बायोथेराप्यूटिक्स’ हे आस्थापन गेल्या २० वर्षांपासून गायीच्या खुरामध्ये ‘अँटिबॉडीज’ विकसित करत आहे.
( ‘सॅब बायोथेराप्यूटिक्स’ या आस्थापनाच्या संशोधनाचा लेख वाचण्यासाठी खालील चित्रांवर क्लिक करा )
३. या आस्थापनाकडून गायींमध्ये अनुवांशिक पालट केले जातात. जेणेकरून त्यांच्या रोगप्रतिकारक पेशी अधिक वाढू शकतील. ज्यामुळे त्या धोकादायक आजारांशी चांगल्या प्रकारे लढू शकतील. या सर्व प्रक्रियेनंतर या गायी मोठ्या प्रमाणात ‘अँटीबॉडीज’ बनवतात, ज्याचा उपयोग मानवांसाठी होऊ शकतो.
४. ‘सॅब बायोथेराप्यूटिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एडी सुलिवान यांनी सांगितले की, ‘इतर लहान जिवांच्या तुलनेत गायींमध्ये अधिक रक्त असते. त्यामुळे तिच्या शरिरात ‘अँटीबॉडीज’ही अधिक बनतात, ज्याचा नंतर माणसांमध्ये वापर केला जाऊ शकतो. जगातील बहुतेक आस्थापने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’ विकसित करत आहेत. गायींमधील चांगली गोष्ट म्हणजे त्या ‘पॉलीक्लोनल अँटीबॉडीज’ बनवतात. कोणत्याही विषाणूचा नाश करण्यासाठी त्या अधिक सक्षम आहेत.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात