कोझिकोड (केरळ) – केरळच्या कोझिकोड शहरात हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी महाभारतम् धर्मरक्षा संगम या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेला लक्षावधी हिंदू सहभागी झाले होते. कोझिकोड शहरातील समुद्रकिनार्यावर भरलेल्या या भव्य धर्मसभेने जगाला हिंदूंची शक्ती आणि ऐक्याचे दर्शन करून दिलेे. त्यामुळे केरळमधील हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही धर्मसभा महत्त्वाची ठरली आहे.
१. चिन्मय मिशन, श्री रामकृष्ण मिशन, माता अमृतानंदमयी मठ, कोलाथूर अद्वैत आश्रम यांसारख्या आध्यात्मिक संघटना, तसेच धर्मरक्षा वेदी, हिंदु मुन्नानी, धर्मजागरण मंच, विहिंप यांसारख्या हिंदुत्ववादी संघटना यांनी या धर्मसभेचे आयोजन केले होते.
२. कोलाथूर अद्वैत आश्रमाचे प्रमुख स्वामी चिदानंदपुरी यांच्या अध्यक्षतेखाली ही धर्मसभा घेण्यात आली. शिवगिरी मठाचे प्रमुख स्वामी प्रकाशनंद यांचे या वेळी मुख्य भाषण झाले.
३. भाजपचे केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनीही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
४. योगऋषी रामदेवबाबा यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ नेते आणि धर्मगुरु यांनीही या धर्मसभेला संबोधित केले.
५. राममंदिर, गोहत्येवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालणे, लव्ह जिहाद रोखणे, धर्मांतरावर बंदी, समान नागरी कायदा, केरळमधील देवस्वम् मंडळांना शासनाच्या कचाट्यातून मुक्त करणे यांसारख्या हिंदूंवर अन्यायांच्या विरोधात हिंदूसंघटनाच्या आवश्यकतेवर उपस्थित संत आणि हिंदु नेत्यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात