सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती, राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ मे या दिवशी ‘ऑनलाईन’ शौर्यजागरण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये सोलापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील ५० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी धर्मप्रेमींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मातृभूमीसाठी समर्पण आणि त्याग’ याविषयी मार्गदर्शन केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याविषयी सांगतांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्म न सोडण्यासाठी मृत्यू पत्करला, तसेच झाशीच्या राणीचे ब्रिटिशांपासून आपले राज्य वाचवण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न आणि बलीदान’ यांविषयी माहिती दिली. व्याख्यानाच्या समारोप प्रसंगी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो !’, ‘रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो !’, ‘धर्मवीर संभाजी महाराज यांचा विजय असो !’, अशा घोषणा दिल्या.
अभिप्राय
१. कु. संजना चारी, सोलापूर – व्याख्यान ऐकून वीरता निर्माण झाली आणि मातृभूमीची भक्ती कशी करावी, याची प्रेरणा मिळाली.
२. कु. लक्ष्मी पारे, सोलापूर – सर्व क्रांतिकारकांनी लहान वयातच शौर्य गाजवले. हिंदु धर्माविषयी मला अभिमान वाटत आहे.
३. कु. ज्ञानेश्वरी जगताप, बार्शी, सोलापूर – वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी नवीन माहिती मिळाली. त्यांच्यातील राष्ट्रप्रेम शिकायला मिळाले.
४. कु. पूनम केंद्रे, अंबाजोगाई, बीड – सर्व क्रांतीकारक आणि छत्रपती संभाजी महाराज यांना वैयक्तिक जीवनही होते; पण त्यांनी त्यांचे जीवन मातृभूमीसाठी दिले. देशप्रेम काय असते, हे व्याख्यानाच्या माध्यमातून समजले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात