- सर्वधर्मसमभावाचा डांगोरा पिटणारे आता कोणत्या बिळात दडी मारून आहेत ? कि युवक हिंदु असल्याने ते नेहमीप्रमाणे सोयीस्कर मौन बाळगणार ?
- हिंदूंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? कि असे मोठमोठे शब्द केवळ विशिष्ट धर्मियांनाच लागू होतात ?
सातारा : जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका हिंदु युवकावर धर्मांधांनी तलवारीने आक्रमण केले. बाजार चौकात २ गटांमध्ये जोरदार चकमक झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवत या घटनेेचा निषेध नोंदवला.
१. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता राजेखान पठाण (वय ६९ वर्षे), इस्माईल अदिल इनामदार (वय २६ वर्षे), अर्षद नईम शेख (वय २५ वर्षे) आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी प्रतीक काळोखे आणि गणेश घाडगे यांच्यावर तलवारीने प्राणघातक आक्रमण केले.
२. त्यानंतर तरुणांचा मोठा जमाव एकत्र आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याविषयी वाठार पोलीस ठाण्यात रात्री उशिरा परस्परविरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या.
३. या प्रकरणी ५ जणांना अटक केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
४. या घटनेची धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी उपाययोजना म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या ५ संशयित आरोपींना कोरेगाव येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सर्वांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात