-
नेपाळच्या नव्या मानचित्राला विरोध केल्याचा परिणाम
-
देश सोडून जाण्याची धमकी
चीनचा बटीक होऊन आततायीपणा करणार्या नेपाळ सरकारला विरोध करून एका अर्थी भारताची बाजू घेणार्या सरिता गिरी यांचे अभिनंदन ! गिरी यांना प्रसंगी भारताने आश्रय देऊन त्यांचे रक्षण करावे !
काठमांडू (नेपाळ) : नेपाळ सरकारने १० जून या दिवशी संसदेत सुधारणा प्रस्ताव संमत करून नेपाळच्या नव्या मानचित्राला (नकाशाला) संमती दिली आहे. या मानचित्रात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे भारताचे भूभाग दाखवले आहेत. या प्रस्तावाला येथील जनता समाजवादी पक्षाच्या महिला खासदार सरिता गिरी यांनी विरोध केल्याने ११ जून या दिवशी त्यांच्या घरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केली, तसेच गिरी यांना देश सोडून जाण्याची धमकी दिली. या आक्रमणाची माहिती गिरी यांनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी कोणतेही साहाय्य केले नाही. इतकेच नव्हे, तर गिरी यांना त्यांच्या आणि अन्य पक्षांनीही साहाय्य केले नाही अन् त्यांचे समर्थन केले नाही.
सरिता गिरी यांचे म्हणणे आहे की, ‘नव्या मानचित्रासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव रहित केला पाहिजे; कारण नेपाळ सरकारकडे कालापानी, लिपुलेख आणि लिंपिआधुरा हे भाग त्याचे असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.’ (नेपाळला घरचा अहेर ! यातून नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा खोटेपणा उघड होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सामाजिक माध्यमांतून सरिता गिरी यांच्या घरावरील आक्रमणाचा निषेध केला जात आहे. यामागे नेपाळ सरकारचाच हात असल्याचा आरोप केला जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात