‘साऊथ आफ्रिका हिंदु महासभे’च्या तक्रारीनंतर ‘फेसबूक’ने ‘व्हिडिओ’ हटवला
- ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! कुठे हे ‘विश्वचि माझे घर’अशी शिकवण देणारे हिंदु धर्मातील महान संत, तर कुठे अन्य धर्माविषयी द्वेषभावना पसरवणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक !
- हिंदु धर्मावरील आघाताच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्या ‘साऊथ आफ्रिका हिंदु महासभे’चे अभिनंदन ! भारतातील हिंदुत्वनिष्ठांनीही यातून बोध घ्यावा !
डर्बन (दक्षिण आफ्रिका) : येथील एका भारतीय वंशाच्या ख्रिस्ती धर्मप्रसारकाने हिंदूविरोधी गरळओक केली. याविरोधात हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार केल्यानंतर ‘फेसबूक’ने सदर ‘व्हिडिओ’ हटवला. सिमोन ब्रॅडली चेट्टी असे या धर्मप्रसारकाचे नाव आहे.
चेट्टी हे डर्बनच्या दक्षिणेस असलेल्या चॅट्सवर्थ येथे जमावाला संबोधित करत होते. यात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळओक केली. हा ‘व्हिडिओ’ ‘फेसबूक’वरून सर्वत्र प्रसारित झाला. तो पाहिल्यानंतर ‘साऊथ आफ्रिका हिंदु महासभा’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने त्यावर आक्षेप घेऊन त्याला विरोध केला. या संघटनेने म्हटले आहे की, ‘आम्ही चेट्टी आणि ते ज्या चर्चशी संबंधित आहे ते चर्च, यांच्या विरोधात पोलिसांत रीतसर तक्रार प्रविष्ट केली आहे. संबंधितांनी बिनशर्त क्षमा मागितली पाहिजे. हिंदूंकडून अशाप्रकारचे आघात सहन केले जाणार नाहीत. ‘फेसबूक’वरून सदर ‘व्हिडिओ’ काढून टाकण्यात आला आहे.’
अन्य पंथियांकडूनही चेट्टी यांचा निषेध
हिंदु धर्माचा अवमान केल्याने चेट्टी यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवरून येथील अन्य पंथियांनीही रोष व्यक्त केला, तसेच त्यांचा निषेध केला. ‘चेट्टी यांनी धार्मिक उपक्रमासाठी जमाव जमवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी’, अशी मागणीही सामाजिक माध्यमांवरून करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात