Menu Close

पाकमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु व्यक्तीच्या जळत्या चितेवर पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न !

पाकमध्ये हिंदु व्यक्तीच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कारास धर्मांध मुसलमानांचा विरोध

पाकमध्ये हिंदूंना जिवंतपणीच नव्हे, तर मेल्यावरही कसे छळले जाते, याचे हे उदाहरण ! पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचारांविषयी कुणीही एका शब्दानेही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

दादू (पाकिस्तान) : दादू शहरात एका हिंदु व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास धर्मांध मुसलमानांनी विरोध केला. धर्मांध मुसलमानांनी सदर हिंदु व्यक्तीच्या जळत्या चितेवर पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला.

येथे केवलराम या हिंदु व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह येथील स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे त्यास अग्नीही देण्यात आला, तेव्हा स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्यास विरोध केला अन् उपस्थित हिंदूंवर आक्रमण केले. त्यांनी जळणार्‍या चितेवर पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला. ‘घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली’, असा आरोप हिंदूंनी केला आहे. याविषयीचे वृत्त ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *