हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनाचे यश !
निपाणी (जिल्हा बेळगाव) : ‘सुंदर इंडस्ट्रीज’ या आस्थापनाच्या ‘फ्रूट बाईट’ या बिस्किटाच्या पाकिटावर हलालचा शिक्का आहे, हे लक्षात आल्यावर निपाणी येथील वितरक श्री. तुषार माळी यांनी आस्थापनाला ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने आम्हाला नकोत’, असे कळवले. याचसमवेत परिसरातील काही जागरूक धर्मप्रेमींनीही या आस्थापनास ई-मेल, तसेच अन्य माध्यमांतून ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने आम्हाला नकोत’, असे कळवले. या विरोधामुळे जूनमध्ये ‘सुंदर इंडस्ट्रीज’ आस्थापनाने त्याच्या ‘फ्रूट बाईट’ या बिस्किटावरील ‘हलाल’चा शिक्का काढून टाकला आहे. (हलालच्या उत्पादनांना विरोध करणारे निपाणी येथील वितरक श्री. तुषार माळी आणि परिसरातील हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन ! याचप्रकारे अन्य ठिकाणच्या हिंदूंनी जागरूक राहून ‘हलाल’ असलेल्या उत्पादनांना विरोध करणे, संबंधित आस्थापनांना तसे कळवणे, असे केल्यास त्यांनाही हा शिक्का काढून टाकणे आणि हलाल प्रमाणपत्र न घेणे भाग पडेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. ‘हलाल’ शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालणे, समाजात जागृती करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे मार्चमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या पूर्वी विविध आस्थापनांची उत्पादने वितरण करणारे वितरक श्री. तुषार माळी यांनी हा विषय समजून घेतला. यानंतर श्री. माळी यांनी ‘सुंदर इंडस्ट्रीज’ आस्थापनाला ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने आम्हाला नकोत’, असे कळवले.
२. या कालावधीत परिसरातील अनेक नागरिक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि वितरक यांनी विविध माध्यमांतून ‘सुंदर इंडस्ट्रीज’ आस्थापनाला ‘हलाल’ शिक्का असलेली उत्पादने आम्हाला नकोत’, असे कळवले.
३. सर्व ठिकाणांहून आलेल्या दबावानंतर ‘सुंदर इंडस्ट्रीज’ आस्थापनाला ‘फ्रूट बाईट’ या बिस्किटावरील ‘हलाल’चा शिक्का काढून टाकणे भाग पडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात