Menu Close

श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीला धर्मबाह्य आणि अशास्त्रीय रासायनिक लेपन नको !

संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थानच्या विश्‍वस्त सौ. ललिता शिंदे यांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांच्या ते लक्षात येत नाही का ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला रासायनिक वज्रलेप करण्याचे काम थांबवून मूर्तीशास्त्र आणि धर्मशास्त्र यांप्रमाणे वज्रलेप विधीस मान्यता द्यावी अन्यथा या धर्मबाह्य आणि अशास्त्रीय पद्धतीने केल्या जाणार्‍या रासायनिक लेपन विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले जाईल, अशी चेतावणी नाशिक येथील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थानच्या विश्‍वस्त सौ. ललिता शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (अशाप्रकारे रायायनिक लेपन करण्याविषयी मंदिर समितीने धर्माचार्यांचे मत घेतले होते का ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात )

श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे संवर्धन करण्यासाठी मूर्तीवर वज्रलेप करण्याची अनुमती मंदिर समितीच्या वतीने मागितली होती. या मागणीप्रमाणे विधी आणि न्याय विभागाने वज्रलेपनास अनुमती दिली आहे. दळणवळण बंदीच्या काळात या मूर्तींवर वज्रलेप करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली होती.

सौ. ललिता शिंदे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून मूर्तीला रासायनिक लेपन करणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीही मंदिर समितीने वर्ष २००५ आणि वर्ष २०१२ मध्ये स्वयंभू मूर्तीला वज्रलेप केला होता. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे देवस्थानच्या विनंतीनुसार पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी मूर्तीची पहाणी करतात आणि त्यांच्या शिफारसीनुसार हा कथित वज्रलेप केला गेला आहे. आताही तीच पद्धत अवलंबली जात आहे.

२. मुळात हिंदु धर्मशास्त्रानुसार वज्रलेप हा स्वतंत्र विधी आहे. त्यात आयुर्वेदानुसार पर्यावरणानुकूल द्रव्यांचा वापर केला जातो; मात्र पुरातत्व विभागाकडून दिला जाणारा हा लेप वज्रलेप नसून ते रासायनिक लेपन आहे. यात अनेक घातक आणि धर्मशास्त्राला निषिद्ध अशी द्रव्ये आहेत. त्यामुळे मूर्तीच्या पावित्र्याला बाधा येत असून भाविकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार होत आहे.

३. मंदिर देवस्थानने मूर्तीला लेपन करण्याचे काम बंद करून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक, वज्रलेपाविषयी धर्मशास्त्रीय ज्ञान असलेले काशी येथील द्रवीड गुरुजी, पंढरपूर येथील भीमचार्य वरखेडकर गुरुजी, नाशिक येथील शांताराम भानुसे, सातारा येथील शरद शास्त्री जोशी या विद्वानांची बैठक बोलावून धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घ्यावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *