-
‘#HinduUnitedAgainstTerror’ या ट्विटर ट्रेंड जगभरातील हिंदूंनी आवाज उठवला
-
भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व
हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात जगभरातील हिंदू जागृत होत आहेत, याचे हे उदाहरण होय. अजय पंडिता यांची हत्या करणार्या जिहाद्यांना सरकारने अद्दल घडवावी, हीच हिंदूंची अपेक्षा आहे. तसेच यापुढेही भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंकडे कुणी वक्रदृष्टीने पहाणार नाही, एवढी जरब सरकारने हिंदुद्वेष्ट्यांवर निर्माण करणे आवश्यक !
नवी देहली : काश्मिरी हिंदु असलेले अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ जगभरातील हिंदूंनी ठिकठिकाणी आंदोलने करून अजय पंडिता यांना न्याय मिळण्याची मागणी केली. जगभरातील १०० शहरांमध्ये या आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी या आंदोलनांचे आयोजन केले होते. या हत्येच्या निषेधार्थ ‘#HinduUnitedAgainstTerror’ या ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ‘ट्विटर’वर ‘ट्रेंड’ करण्यात आला. जागतिक स्तरावर हा ‘हॅशटॅग’ जागतिक स्तरावर दुसर्या क्रमांकावर होता.
न्यूझीलंड येथील ऑकलंड शहरात आंदोलन
अजय पंडिता यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरात शेकडो हिंदू एकत्रित आले आणि त्यांनी हत्येचा निषेध केला. या वेळी हिंदूंनी काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला, तसेच काश्मिरी हिंदूंचे काही अटी शर्थींवर पुन्हा काश्मीरमध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी केली.
‘#HinduUnitedAgainstTerror’ या ऐतिहासिक ट्रेंडच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण माहिती !
- ट्विटरवरील जागतिक ट्रेंड्समध्ये (Worldwide trends) तब्बल २ घंटे दुसर्या क्रमांकावर, तर ४ घंटे पहिल्या ५ मध्ये !
- एकूण ५ लाखांहून अधिक लोकांनी केल्या ट्वीट्स !
- जागतिक स्तरावर सर्वाधिक चर्चित ट्रेंड्समध्ये (Todays hottest twitter trends worldwide) नोंद !
- भारतामध्ये ४ घंटे पहिल्या स्थानावर, तर तब्बल ९ घंटे पहिल्या ५ मध्ये !
How people in various countries are joining global campaign #HinduUnitedAgainstTerror pic.twitter.com/bTDy28GsAV
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) June 14, 2020
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात