हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन सोशल मिडिया’ कार्यशाळा
नवी देहली : मध्यप्रदेश, राजस्थान आणि देहली येथील धर्मप्रेमींसाठी ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन सोशल मिडिया’ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ३० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी फेसबूक, ट्विटर यांसारख्या सामाजिक माध्यमांद्वारे धर्मप्रसाराचे कार्य कसे करावे, याविषयी माहिती सांगितली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन युवा शिबिरा’ चे आयोजन
नवी देहली : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील बालसाधक अन् युवासाधक यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन युवा शिबिर’ शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे शिबिरार्थींना अनमोल मार्गदर्शन लाभले. या वेळी कु. मनीषा माहूर, कु. रूची पन्वर, सौ. संध्या आगरकर आणि सौ. मोनिका सिंग यांनी स्वभावदोष निर्मूलन अन् व्यक्तीमत्त्व विकास यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. देवेन पाटील आणि श्री. प्रथमेश वाळके यांनी केले. या शिबिरात ६० पेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते.
राजस्थान आणि देहली येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ कार्यशाळा
नवी देहली : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान आणि देहली येथील धर्मप्रेमींसाठी ३० मे या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यशाळा घेण्यात आली. ‘हिंदुजागृति डॉट ओआर्जी’ या संकेतस्थळाचे वापरकर्ते धर्मप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. या वेळी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटीया यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपले योगदान’ याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी समितीच्या कार्याची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी केले. या कार्यशाळेत ६० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.