सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गामुळे मिळाली प्रेरणा !
असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !
कल्याण : येथील एका या खासगी शिकवणीवर्गाच्या वतीने सध्या इयत्ता १० वीचे ‘ऑनलाईन’ अभ्यासवर्ग चालू करण्यात आले आहेत. या वर्गात एका शिक्षिकेने हिंदु धर्मविरोधी तथ्यहीन, तसेच दोन धर्मांत तेढ निर्माण होईल ,अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली; मात्र ही उदाहरणे चुकीची आणि हिंदुविरोधी आहेत, हे कु. मनुश्री भारंबे या विद्यार्थिनीच्या लक्षात आले. तिने ही गोष्ट पालकांना सांगितली. पालकांनी शिकवणीवर्गाच्या मुख्य शिक्षकांना भ्रमणभाष करून ‘तो अभ्यासवर्ग ‘यु-ट्यूब’ वरून काढा’, असे सांगितले, तसेच संबंधित शिक्षिकेला क्षमा मागण्यास भाग पाडले.
१. १२ जून या दिवशी संध्याकाळी कु. मनुश्री भारंबे हिचा इयत्ता १० वीचा ‘ऑनलाईन’ शिकवणीवर्ग चालू होता. त्यात ‘डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स’ हा विषय शिकवतांना शिक्षिकेने हिंदूंच्या विरोधात, तसेच हिंदूंमध्ये तेढ निर्माण होईल, अशी उदाहरणे दिली.
२. बाबरी मशिदीच्या खटल्यामध्ये मुसलमानांनी दाखवलेला संयम, त्यांच्यावर झालेला अन्याय, तसेच हिंदूंनी पाडलेली बाबरी मशीद यांविषयी सांगितले. ‘न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला नसता, तर हिंदूंनी दंगल केली असती. मुसलमानांना न्यायालयाने अल्प जागा दिली आणि हिंदूंना न्यायालयाने अधिक जागा दिली, तरीही मुसलमान कसे शांत आहेत’, हे पटवून देण्याचा प्रयत्न त्या शिक्षिकेने केला. (विद्यार्थ्यांना धादांत खोटी माहिती सांगून त्यांना दिशाहीन करू पहाणार असे हिंदुद्वेषी शिक्षक मुलांच्या मनात हिंदुद्वेष पेरतात. यासाठी पालकांनी जागृत रहायलाच हवे; पण त्याच्या जोडीला मुलांनाही वेळीच धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्यामध्येही धर्मप्रेम जागृत होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. सीएए आणि एन्.आर्.सी. हे मुसलमानांच्या विरोधात कसे आहेत, याविषयीही शिक्षिकेने सांगितले.
४. हा सर्व प्रकार कु. मनुश्रीने पालकांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर तिचे वडील श्री. अजय भारंबे यांनी शिकवणीवर्गाच्या मुख्य शिक्षकांना संपर्क करूनहा हा प्रकार थांबवला.
५. ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू असलेले ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग ऐकत असल्यामुळे ही जागरूकता कु. मनुश्रीमध्ये निर्माण झाली असून शिक्षिकेकडून धर्महानी होत असल्याचे कळले. इतर विद्यार्थ्यांच्या ही गोष्ट लक्षातही आली नाही’, असे मत श्री. अजय भारंबे यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. (धर्मशिक्षण मिळण्यासाठी आणि ठिकठिकाणी होणारी धर्महानी रोखण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गांचा लाभ घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात