- बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू !
- बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार काही पावले उचलणार का ?
नवी देहली : बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांमध्ये सतत वाढ होत आहे. बांगलादेशमध्ये मानवाधिकारांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच वाईट होत चालली आहे. तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना न्याय मिळणे अशक्य झाले आहे. हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध गुन्हेगारांना अटकही केली जात नाही. हे असेच चालू राहिल्यास बांगलादेशमध्ये हिंदू नामशेष होतील. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशविच्छेद करण्याचे हे षड्यंत्र आहे, असे विश्व हिंदु महासंघाच्या बांगलादेश विभागाच्या सरचिटणीसांनी सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मे २०२० मासामधील घटना
४ हिंदूंची हत्या
१० मंदिरांची नासधूस आणि मूर्तींची तोडफोड
४ हिंदु मुलींचे अपहरण
५ हिंदु मुलींवर बलात्कार
८ हिंदु मुलींवर बलात्काराचा प्रयत्न
३ हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर
हिंदु व्यापार्यांची १२ दुकाने लुटली
हिंदूंच्या ४३५ एकर भूमीवर धर्मांधांचे नियंत्रण
४३ हिंदु कुटुंबांना त्यांच्या वस्त्या रिकाम्या करण्यास भाग पाडले
१० हिंदु कुटुंबांवर देश सोडून जाण्यासाठी बळजोरी
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात